ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा होणार ग्रे घटस्फोट?, ‘त्या’ पोस्टवर अभिनेत्याने…
Aishwarya rai and Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात वाद सुरू असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. हेच नाहीतर लवकरच दोघांचा घटस्फोट होणार असल्याचेही सातत्याने सांगितले जात आहे. ऐश्वर्या राय ही अनंत अंबानीच्या लग्नात आपल्या मुलीसोबत पोहचली होती.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात वाद सुरू असल्याचे सांगितले जातंय, हेच नाहीतर यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याचीही चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच अभिषेक बच्चन याने सोशल मीडियावर ग्रे घटस्फोटाची एक पोस्ट लाईक केली. यानंतर तूफान ऐश्वर्या राय आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या. त्यामध्येच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट याच्या लग्नाला ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबियांसोबत पोहोचली नाही. ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबतच अनंतच्या प्रत्येक सेरेमनीला पोहोचली. मात्र, अमिताभ बच्चन आणि जया यांची लेक श्वेता बच्चन ही बच्चन कुटुंबासोबतच अनंतच्या लग्नाला पोहोचली.
गेल्या काही दिवसांपासून सांगितले जात आहे की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाला कारण श्वेता हिच आहे. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय हिने जलसा बंगला सोडलाय. हेच नाहीतर आपल्या मुलीसोबत ती तिच्या आईच्या घरी राहण्यास गेलीये. श्वेता बच्चन हिचे जलवा बंगल्यात राहाणे मुळात ऐश्वर्याला अजिबात पटत नाही.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे ग्रे घटस्फोट घेणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगितले आहे. अभिषेक यानेही ग्रे घटस्फोटाच्या संदर्भातीलच पोस्ट सोशल मीडियावर लाईक केली होती. लग्नानंतर 10 ते 15 वर्षांनी एकत्र राहून लोक घटस्फोट घेतात. सध्या वृद्धापकाळातही घटस्फोटाच्या घटना वाढत आहेत. हा ट्रेंड इतर देशांत जास्त असला तरी आता भारतातही तो हळूहळू वाढत आहे. याला ग्रे घटस्फोट म्हणतात.
सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, यावर अभिषेक बच्चन किंवा ऐश्वर्या यांच्याकडूनही भाष्य करण्यात नाही आले. फक्त हेच नाहीतर बच्चन कुटुंबही यांच्या घटस्फोटावर काहीच बोलत नाहीये. यामुळे बच्चन कुटुंबियांमध्ये सर्वकाही व्यवस्थित नसल्याचे तर स्पष्ट आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न झाले. अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर ऐश्वर्या राय ही सलमान खान याला डेट करत होती. यांचे लग्न होईल, असे सर्वांनाच वाटत होते. मात्र, यांचे ब्रेकअप एका वाईट स्थितीमध्ये झाले.