ऐश्वर्या राय लेकीसोबत भारतात दाखल, घटस्फोटाच्या चर्चांमध्येच अभिनेत्री…
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळतंय. मात्र, ऐश्वर्या रायच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे सांगितले जातंय. अभिषेक आणि तिच्यामधील वाद टोकाला गेल्याची चर्चा आहे.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय ही काही दिवसांपूर्वीच पॅरिस फॅशन वीक 2024 मध्ये पोहोचली होती. विशेष म्हणजे यावेळी ऐश्वर्या राय हिच्यासोबत तिची लेकही पोहोचली होती. ज्यावेळी ऐश्वर्या राय हिला पुरस्कार मिळत होता, त्यावेळी काैतुकाने आपल्या आईचा व्हिडीओमध्ये मोबाईलमध्ये शूट करताना आराध्या बच्चन दिसली. पॅरिस फॅशन वीकनंतर लगेचच ऐश्वर्या राय आणि आराध्या या IIFA अवॉर्ड्स 2024 मध्ये पोहोचल्या. अबुधाबीला जातानाचे ऐश्वर्या आणि आराध्या यांचे विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसले.
हेच नाही तर IIFA अवॉर्ड्स 2024 मध्ये जलसा करताना ऐश्वर्या राय ही दिसली. पुरस्कार सोहळ्यात खास लूकमध्ये ऐश्वर्या ही पोहोचली. ऐश्वर्या राय देखील IIFA अवॉर्ड्स 2024 मध्ये पुरस्कार मिळाला. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा IIFA अवॉर्ड्स 2024 मधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. त्या व्हिडीओमध्ये लेकीचे केस व्यवस्थित करताना ऐश्वर्या राय ही दिसली.
ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन या IIFA अवॉर्ड्स 2024 नंतर भारतात परतल्या आहेत. IIFA अवॉर्ड्स 2024 चा आज शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वीच ऐश्वर्या लेकीला घेऊन भारतात आलीये. आता ऐश्वर्या आणि आराध्या यांचे मुंबई विमानतळावरील खास फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. मात्र, या फोटोमध्ये आराध्या हिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट जाणवत आहे.
View this post on Instagram
ऐश्वर्या राय ही ओव्हरसाईज कपड्यांमध्ये यावेळी दिसली. अभिनेत्रीने केस मोकळे सोडले होते. गुलाबी रंगाच्या टीशर्टवर आराध्या बच्चन ही दिसली. यावेळी विमानतळावरून जाताना ऐश्वर्या राय हिने आपल्या लेकीचा हात पकडल्याचे बघायला मिळाले. आराध्या आणि ऐश्वर्या यावेळी पापाराझी यांच्याकडे पाहून फोटोसाठी पोझ देताना देखील दिसल्या.IIFA अवॉर्ड्स 2024 यावेळी ऐश्वर्या राय हिला थेट रिपोर्टरकडून विचारण्यात आले की, ती (आराध्या) नेहमी तुझ्यासोबत असते.. ती बेस्ट शिकत आहे… तुमच्यासोबत असते…
तो रिपोर्टर पुढे काही बोलण्याच्या आतच थेट ऐश्वर्या राय ही म्हणाली की, ती माझी मुलगी आहे आणि ती माझ्यासोबतच असणार. सतत आईसोबत विदेशात जात असल्यावरून लोक आराध्या शाळेत नेमकी कधी जाते हा प्रश्न विचारताना दिसत होते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असून दोघांमधील वाद टोकाल गेल्याचे सांगितले जातंय. घटस्फोटाच्या चर्चा सुरू असल्यापासून ऐश्वर्या ही सतत विदेशात जाताना दिसत आहे.