ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चनला सोडून थेट सलमान खानसोबत पोहोचली लग्नात?, ‘ते’ फोटो व्हायरल, घटस्फोट…
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात वाद सुरू असल्याचे सातत्याने सांगितले जातंय. हेच नाही तर मध्यंतरी रिपोर्टनुसार ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचेही सांगितले गेले. लवकरच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे घटस्फोट घेणार असल्याचेही सातत्याने सांगितले जाते आहे.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. चित्रपटांसोबतच ऐश्वर्या राय हिचे खासगी आयुष्यही कायमच चर्चेत राहिलेले आहे. ऐश्वर्या राय हिने अनेक वर्ष बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला डेट केले. हेच नाही तर ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचे लग्न झाल्याचीही चर्चा रंगताना दिसली. मात्र, एका वाईट वळणावर यांचे रस्ते वेगळे झाले. सलमान खान याच्यासोबतच्या वादानंतर ऐश्वर्या राय हिने बॉलिवूड अभिनेता आणि अमिताभ बच्चन यांचा लेक अभिषेक बच्चन याला डेट करण्यास सुरूवात केली. 2007 मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी लग्न केले. ऐश्वर्या राय हिने जरी अभिषेकसोबत लग्न केले असले तरीही अजूनही सलमान खान याने लग्न केले नाहीये.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांना एक मुलगी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सातत्याने रंगताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन घटस्फोट घेत असल्याचे सांगितले जातंय. ऐश्वर्या आणि अभिषेकमधील वाद टोकाला गेलाय. सतत घटस्फोटाच्या चर्चा असताना यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये.
दुसरीकडे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नालाही ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबियांसोबत पोहोचली नाही. यामुळेच ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा अधिकच रंगल्या. एक फोटो सोशल मीडियावर काही दिवसांपासून तूफान व्हायरल होतोय. या फोटोनंतर असा दावा केला जातोय की, ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबासोबत नाही तर सलमान खान याच्या कुटुंबासोबत अनंत अंबानीच्या लग्नात पोहोचली होती.
फोटोमध्ये ऐश्वर्या राय, सलमान खान आणि त्याची बहीण अर्पिता खान हे दिसत आहेत. हेच नाही तर फोटोमध्ये ऐश्वर्या राय हिने सलमान खानच्या हातामध्ये हात दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. दुसऱ्या बाजूला सलमान खानची बहीण अर्पिता ही देखील दिसत आहे. हा फोटो पाहून लोकही हैराण झाले. सलमान खान हाच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन याच्या घटस्फोटाचे कारण असल्याचेही सांगितले जातंय.
ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचा जो फोटो व्हायरल होतोय तो फोटो खरा नाहीये. ऐश्वर्या राय आणि सलमान खानचा व्हायरल होणारा हा फोटो एडिट करण्यात आलाय. ऐश्वर्या राय ही जरी अनंत अंबानीच्या लग्नात बच्चन कुटुंबियांसोबत पोहोचली नव्हती. मात्र, ती आपली मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत पोहोचली होती. आराध्यासोबत फोटोसाठी अनेक पोझ देतानाही ऐश्वर्या राय ही दिसली होती.