Aishwarya Rai | ‘सलमान, शाहरुख… सर्वात मोठा खान कोण?’ ऐश्वर्याच्या उत्तरानंतर सर्वत्र खळबळ

Aishwarya Rai | 'बॉलिवूडचा सर्वात मोठा खान कोण?', अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने दिलेलं उत्तर ऐकून व्हाल हैराण... सध्या सर्वत्र ऐश्वर्या राय हिने दिलेल्या उत्तराची चर्चा

Aishwarya Rai | 'सलमान, शाहरुख... सर्वात मोठा खान कोण?' ऐश्वर्याच्या उत्तरानंतर सर्वत्र खळबळ
Follow us
| Updated on: Sep 11, 2023 | 3:00 PM

मुंबई : 11 सप्टेंबर 2023 | अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहेत. बॉलिवूडमध्ये अनेक नव्या अभिनेत्यांनी पदार्पण केलं आहे. पण शाहरुख – सलमान खान याची बॉलिवूडमध्ये असलेलं स्थान कोणीही घेवू शकलेलं नाही. शाहरुख – सलमान फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत असतात. शाहरुख त्याच्या कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तर सलमान खान त्याच्या प्रेम प्रकरणांमुळे चर्चेत असते. अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या नात्याबद्दल सर्वांना माहिती आहे. मोठ्या पडद्यावरच नाही तर, खऱ्या आयुष्यात देखील सलमान – ऐश्वर्या ही जोडी चाहत्यांना प्रचंड आवडत होती. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

ब्रेकअपनंतर ऐश्वार्याने हिने सलमान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. सलमान खान याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अभिनेत्रीने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर ऐश्वर्या आणि अभिषक यांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं.

दरम्यान, ऐश्वर्या आणि अभिषक बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये पोहोचले होते. तेव्हा रॅपिड फायर राऊंडमध्ये करण याने ऐश्वर्या हिला एक प्रश्न विचारला होता. ज्यावर अभिनेत्रीने मोठ्या हुशारीने उत्तर दिलं..

हे सुद्धा वाचा

‘शाहरुख, सलमान, आमिर, सैफ… कोण आहे सर्वात मोठा खान?’ यावर उत्तर देत ऐश्वर्या म्हणाली, ‘आम्ही प्रत्येक सीझन्सचे बच्चन आहोत. माझं नाव खान नाही…’ अभिनेत्रीने दिलेलं उत्तर ऐकल्यानंतर करण जोहर देखील हैराण झाला.. सांगायचं झालं तर, ब्रेकअपनंतर सलमान – ऐश्वर्या त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत. पण तरी देखील त्यांच्या नात्याची चर्चा आजही सेलिब्रिटींमध्ये आणि चाहत्यांमध्ये रंगलेली असते.

ऐश्वर्या – अभिषेक यांचं नातं…

सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याने २००७ मध्ये अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं… दोघांना एक मुलगी देखील आहे. ऐश्वर्या – अभिषेक यांच्या मुलीचं नाव आराध्या असं आहे. आराध्या कायम तिच्या आई – वडिलांसोबत अनेक ठिकाणी दिसते. स्टारकिड म्हणून देखील आराध्या लोकप्रिय आहे..

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.