रोड रोमियोंकडून छेडछाड, ऐश्वर्या राय सर्व महिलांना म्हणते, ‘माझं शरीर, माझी योग्यता…’

Aishwarya Rai Bachchan: रस्त्यावर होत असलेल्या छेडछाडीचा तुम्ही कसा सामना करता? ऐश्वर्याचा 'तो' व्हिडीओ तुफान चर्चेत, अभिनेत्री सर्व मगिलांना म्हणाली, 'माझं शरीर, माझी योग्यता...', ऐश्वर्यचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल

रोड रोमियोंकडून छेडछाड, ऐश्वर्या राय सर्व महिलांना म्हणते, 'माझं शरीर, माझी योग्यता...'
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 8:22 AM

Aishwarya Rai Bachchan: अभिनेत्री ऐश्वर्या राय आज बॉलिवूडपासून दूर असली तरी कायम कोणत्यान कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील ऐश्वर्या हिने एका महत्त्वाच्या विषयावर स्वतःचं मत मांडलं आहे. रस्त्यावर महिलांची होणाऱ्या छेडछाडीवर ऐश्वर्याने मौन सोडलं आहे. सध्या ऐश्वर्याचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री सर्व महिलांना होणाऱ्या अत्याचारांचा सामना करण्यासाठी सांगत आहे. सध्या सर्वत्र ऐश्वर्या राय हिची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, ऐश्वर्या राय एका कॉस्मेटिक ब्रँडशी संबंधित आहे. त्याची ब्रँड ॲम्बेसेडर आहे. ऐश्वर्याने ब्रँडसाठी एक प्रमोशनल व्हिडिओ बनवला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री प्रॉडक्टबद्दल नाही तर, महिलांवर होणाऱ्या शोषणाबद्दल बोलताना दिसत आहे…

व्हिडीओमध्ये ऐश्वर्या म्हणते, ‘रस्त्यावर होत असलेल्या छेडछाडीचा तुम्ही कसा सामना करता? त्यांच्याकडे दुर्लक्ष करता? नाही… समस्यांकडे थेट पाहा… मान कायम उंट ठेवा… स्त्रीलिंगी आणि स्त्रीवादी… माझं शरीर, माझी योग्यता… तुमच्या योग्यतेशी बिलकूल तडजोड करू नका… स्वतःला कधीच कमी समजू नका… स्वतःच्या योग्यतेसाठी उभ्या राहा… स्वतःच्या ड्रेसला आणि लिपस्टिकला दोष देऊ नका… रस्त्यांवर होणारी छेडछाड तुमची चूक नाही…’ असं देखील ऐश्वर्या राय म्हणाली.

व्हिडीओमध्ये ऐश्वर्या महिलांना रस्त्यावर होणाऱ्या शोषणाविरोधात आवाज उठवण्यासाठी प्रेरित करत आहे. त्यात अभिनेत्री म्हणते की, त्या अत्याचाराला महिला जबाबदार नाहीत. समस्येचा सामना करा आणि संघर्ष करा…’ सध्या ऐश्वर्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ब्यूटी विथ ब्रेन…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांच्याकडून होत असलेल्या शोषणाबद्दल काय सांगांल…’ सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या प्रोफेशनल नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या – अभिषेक यांचं घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांनी अधिक जोर धरला आहे. पण यावर दोघांनी देखील अधिकृत घोषणा केलेली नाही.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.