अखेर ऐश्वर्या राय हिने केला मोठा खुलासा, थेट म्हणाली, माझी मुलगी…
Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. ऐश्वर्या रायचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे. ऐश्वर्या रायने 2007 मध्ये अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. अगोदर काही वर्ष दोघे एकमेकांना डेट करताना दिसले.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर काही रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट झालाय. आता जलसा बंगल्यानंतर ऐश्वर्या राय ही तिच्या आईच्या घरी शिफ्ट झालीये. घटस्फोटाच्या सतत चर्चा असताना देखील त्यावर भाष्य करणे ऐश्वर्या राय हिच्याकडून टाळण्यात आलंय.
ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिला घेऊन अबुधाबीमध्ये IFA अवॉर्ड्स 2024 पोहोचली आहे. कोणताही पुरस्कार सोहळा असो तिथे ऐश्वर्या हिच्यासोबत आराध्या बच्चन ही कायमच दिसते. IFA अवॉर्ड्स 2024 मध्ये ऐश्वर्या राय ही लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत फोटोसाठी खास पोझ देताना दिसली. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.
फोटोसाठी आराध्या हिच्यासोबत पोझ देत असतानाच ऐश्वर्या राय हिला आराध्या हिच्याबद्दल अत्यंत मोठा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर ऐश्वर्या हिने असे उत्तर दिले की, सर्वांचीच बोलती बंद झाल्याचे बघायला मिळाले. आता ऐश्वर्या राय हिच्याच विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. रिपोर्टर म्हणाला, ती (आराध्या) नेहमी तुझ्यासोबत असते.. ती बेस्टकडून शिकत आहे…
View this post on Instagram
रिपोर्टरचा प्रश्न पूर्ण होण्याच्या अगोदरच ऐश्वर्या राय ही म्हणाली की, व्वा… ती माझी मुलगी आहे, ती नेहमी माझ्यासोबत असते…ऐश्वर्या राय हिच्या या उत्तराची जोरदार चर्चा आता रंगताना दिसत आहे. लेकीबद्दल पुढे काही न ऐकताच ऐश्वर्या ही आपले उत्तर देताना दिसत आहे. आता त्याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
लोक ऐश्वर्या राय हिच्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. मध्यंतरी आराध्या बच्चन हिची एकच हेअरस्टाईल यामुळे लोक ऐश्वर्याला खडेबोल सुनावताना दिसले. त्यानंतर अनंत अंबानी याच्या प्री वेडिंगमध्ये खास लूकमध्ये आराध्या बच्चन ही दिसली होती. लोकांना आराध्याचा लूक प्रचंड आवडला होता.