ऐश्वर्या राय हिने केला ‘तो’ मोठा खुलासा, थेट म्हणाली, तिच्यासाठी…
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचेही सांगितले जातंय. ऐश्वर्या हिने एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्यात वादळ आल्याचे सांगितले जातंय. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांची आराध्या नावाची एक मुलगी देखील आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा रंगताना दिसतंय. ऐश्वर्याने अभिषेक बच्चनचे घर सोडल्याचे देखील सांगितले जातंय. हेच नाही तर विदेशात सतत ऐश्वर्या ही एकटीच जाताना दिसते.
ऐश्वर्या राय हिने अनेक हीट चित्रपट तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये बॉलिवूडला दिली आहेत. ऐश्वर्या रायने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती मोठे भाष्य करताना दिसली. ऐश्वर्याने थेट आलिया भट्ट हिच्याबद्दल भाष्य केले. आलिया भट्ट ही तिच्या आगामी जिगरा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचा प्रोड्यूसर करण जोहर हा आहे.
करण जोहर यानेच आलिया भट्ट हिला बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. हेच नाही तर आतापर्यंत करणच्या अनेक चित्रपटांमध्ये आलिया ही दिसली. एका मागून एक चित्रपट आलिया भट्ट हिला मिळताना दिसत आहेत. करण जोहर याने अगोदरच सांगितले आहे की, आलिया भट्ट ही त्याची मुलगी आहे. याबद्दलच बोलताना ऐश्वर्या ही दिसली आहे.
करणमुळे आलिया भट्टच्या करिअरला खूप मोठा फायदा झाल्याचेही ऐश्वर्या राय हिने म्हटले आहे. ऐश्वर्या राय ही म्हणाली की, मी आलियाला म्हटले की, खरोखरच तुझ्यासाठी हे खूप जास्त छान आहे. सुरूवातीपासूनच करणने तिला खूप सपोर्ट केलाय. आलियासाठी खूप काही गोष्टी एकदम चांगल्या राहिल्या. तिला कोणत्याही गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला नाही.
आलियासाठी पुढील काही वर्षांपर्यंत काही गोष्टी अगोदरच तयार करून ठेवण्यात आल्या आहेत. एक अभिनेत्री म्हणून चांगले आहे. ती (आलिया) फक्त हसते. तिच्यासाठी पुढेही अनेक गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. ऐश्वर्या राय हिने 2018 मध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये आलिया भट्ट हिच्याबद्दल हे विधान केले होते. आता ऐश्वर्याचे विधान चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय.