ऐश्वर्या राय हिचा सर्वात आवडता अभिनेता कोण?, सलमान, अभिषेक की आणखी कोण?
Aishwarya Rai : ऐश्वर्या रायने आतापर्यंत एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिच्या डोळ्यांचे अनेकजण चाहते आहेत. ऐश्वर्या रायने अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिली आहेत.
ऐश्वर्या राय ही बाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे. ऐश्वर्या राय हिने 2007 मध्ये बाॅलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे यांच्या लग्न अत्यंत शाही पद्धतीने पार पडले. कोट्यवधी रूपये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नात खर्च करण्यात आले. 2007 मधील सर्वात चर्चेत असलेले लग्न ऐश्वर्या राय आणि अभिषेकचे होते. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय हिला अत्यंत खास पद्धतीने अभिषेक बच्चनने लग्नासाठी प्रपोज केला होता. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांना एक मुलगी देखील आहे.
ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यास चाहत्यांना नेहमीच आवडते. ऐश्वर्या राय ही तशी सोशल मीडियावर फार सक्रिय नसते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यामध्ये सर्वकाही व्यवस्थित नसल्याचे देखील सातत्याने सांगितले जाते. मात्र, यावर कधीच ऐश्वर्या राय किंवा अभिषेक बच्चन यांनी भाष्य केले नाहीये.
ऐश्वर्या राय हिने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला. हेच नाही तर ऐश्वर्या राय हिने तिच्या आवडत्या अभिनेत्याबद्दल खुलासा केला. ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे. मात्र, पहिल्यांदाच ऐश्वर्या राय ही आपल्या आवडत्या अभिनेत्याबद्दल बोलताना दिसली आहे.
ऐश्वर्या राय हिला विचारण्यात आले की, तुझा सर्वात आवडता अभिनेता कोण आहे? यावर ऐश्वर्या राय हिने दुसरे तिसरे कोणाचे नाही तर पती अभिषेक बच्चन याचेच नाव घेतले. ऐश्वर्या राय म्हणाली की, माझा आवडता अभिनेता अभिषेक बच्चन हाच आहे. मला त्याच्यासोबत काम करण्यास आवडते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकसोबत काम केले.
विशेष म्हणजे लोकांना स्क्रीनवर देखील ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची जोडी प्रचंड आवडते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लव्ह स्टोरी चित्रपटाच्या सेटवरून सुरू झाल्याचे देखील सांगितले जाते. अभिषेक बच्चन याला डेट करण्याच्या अगोदर ऐश्वर्या राय ही सलमान खान याला डेट करत होती. मात्र, एका वाईट वळणावर ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचे ब्रेकअप झाले.