Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ गोष्टीला नकार देणे ऐश्वर्या राय हिला पडले महागात, अभिनेत्रीला पश्चाताप आणि…

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले जातंय. मात्र, यावर अजूनही बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही काहीही भाष्य केले नाहीये. नुकताच अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या राय मुलीसोबत पोहोचली होती.

'या' गोष्टीला नकार देणे ऐश्वर्या राय हिला पडले महागात, अभिनेत्रीला पश्चाताप आणि...
Aishwarya Rai
Follow us
| Updated on: Jul 14, 2024 | 12:54 PM

ऐश्वर्या राय हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या रायने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. फक्त अभिनयच नाहीतर ऐश्वर्या राय हिचे खासगी आयुष्यही कायमच चर्चेत राहिले आहे. अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर ऐश्वर्या रायने सलमान खानला डेट केले. मात्र, यांचे ब्रेकअप एका वाईट स्थितीमध्ये झाले आणि दोघांचे रस्ते वेगळे झाले. त्यानंतर ऐश्वर्याने 2007 मध्ये अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन दोघे घटस्फोट घेणार असल्याचे सातत्याने सांगितले जातंय. ऐश्वर्या रायने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हीट चित्रपट दिली आहेत. मात्र, असेही चित्रपट आहेत, ज्याला तिने नकार दिला आणि त्यानंतर त्या चित्रपटामध्ये मोठा धमाका केला. असा एक चित्रपट ज्याला ऐश्वर्या राय हिने नकार दिला आणि त्यानंतर त्या चित्रपटाला थेट राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा चित्रपट नेमका कोणता आणि ऐश्वर्याने या चित्रपटाला नेमका नकार का दिला? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

शंकर दिग्दर्शित 1996 मध्ये आलेला ‘इंडियन’ या चित्रपटाला ऐश्वर्या राय हिने नकार दिला. मात्र, तोच चित्रपट ब्लॉकबस्टर. अगोदर चित्रपटाला विरोधाचा सामना करावा लागला. हा चित्रपट भारतीय चित्रपटांमध्ये सर्वात महागडा चित्रपट होता. कमल हसन याच्या चित्रपटात मनीषा कोईराला नव्हेतर ऐश्वर्या राय ही मुख्य भूमिकेत होती. कमल हसनची पहिली पसंद ऐश्वर्या होती. त्यांनी ऐश्वर्या रायसोबत संपर्क देखील साधला.

ऐश्वर्या राय हिने जाहिरात एजन्सीचे कारण देत या चित्रपटाला नकार दिला. कमल हसनचा चित्रपट इंडियन हा रिलीज झाल्यावर ब्लॉकबस्टर ठरला आणि जगभरात बॉक्स ऑफिसवर 55 कोटींची कमाई केली. फक्त हेच नाहीतर कमल हसन यांच्या या चित्रपटाला 3 राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. या चित्रपटाने थिएटरमध्ये मोठा धमाका केला. अनेक रेकॉर्ड चित्रपटाने तोडले.

ऐश्वर्या राय हिने चित्रपटाला नकार दिल्यानंतर कमल हसन यांनी मनीषा कोईराला चित्रपटात घेतले. ज्यावेळी ऐश्वर्या राय हिने चित्रपटाला नकार दिला, त्यावेळी तिला देखील वाटले नव्हते की हा चित्रपट इतका जास्त हीट ठरेल. ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट केले आहेत. या चित्रपटाला नकार दिल्यानंतर चित्रपट हीट ठरल्यानंतर ऐश्वर्या राय हिला मोठा पश्चाताप झाल्याचे देखील सांगितले जाते.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.