भर मंचावर ऐश्वर्या राय हिने केली ‘ही’ कृती, फक्त अमिताभ बच्चन आणि जया बच्चनच नाही तर चक्क…
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे नेहमीच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. नुकताच ऐश्वर्याला तिच्या अभिनयासाठी एक पुरस्कार मिळालाय. यावेळी ऐश्वर्यासोबत तिची लेक आराध्या देखील पुरस्कार सोहळ्यात पोहोचली होती. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक नक्कीच आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी 2007 मध्ये काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी यांचे लग्न सर्वाधिक चर्चेत असणारे एक लग्न होते. ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर अभिषेकचे लग्न हे करिश्मा कपूरसोबत ठरले होते. मात्र, पुढे त्यांचे लग्न मोडले. ऐश्वर्या ही सलमान खान याच्यासोबत रिलेशनमध्ये होती. अत्यंत वाईट वळणावर यांचे ब्रेकअप झाले.
ऐश्वर्या राय ही नुकताच मुलगी आराध्या बच्चन हिला घेऊन SIIMA अवॉर्ड्समध्ये पोहोचली. यावेळी आराध्या बच्चन हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओनंतर अनेकांनी थेट आराध्याचे काैतुक करत चांगले संस्कार दिल्याचे देखील म्हटले. नातच काय तर बच्चन कुटुंबाच्या सुनेला देखील खूप चांगले संस्कार मिळाल्याचे एका पुरस्कार सोहळ्यात बघायला मिळाले होते.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. त्या व्हिडीओमध्ये एका पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्या राय हिला तिच्या अभिनयासाठी पुरस्कार मिळतो. यावेळी अमिताभ बच्चन यांच्या हातूनच ऐश्वर्याला पुरस्कार मिळणार होता. ऐश्वर्या मंचावर पोहोचते आणि पुरस्कार घेण्याच्या अगोदर सासरे अमिताभ बच्चन यांच्या पाया पडते.
अमिताभ बच्चन यांच्या पाया पडल्यानंतर ऐश्वर्या राय ही पुरस्कार घेते. यावेळी उपस्थित लोकांनी ऐश्वर्या राय हिचे काैतुक केले. जया बच्चन देखील या पुरस्कार सोहळ्यामध्ये पोहोचल्या होत्या. ऐश्वर्याने भर पुरस्कार सोहळ्यात अमिताभ बच्चन यांच्या पाया पडल्याने जया बच्चन यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल बघायला मिळाली.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची सतत चर्चा ही रंगताना दिसत आहे. मात्र, यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अमिताभ बच्चन किंवा जया बच्चन यांनी भाष्य केले नाहीये. अनेक पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत पोहोचताना दिसत आहे. हेच नाही तर काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानीच्या लग्नातही ती मुलीसोबतच पोहोचली होती.