आपल्या नावासमोर बच्चन ऐकताच हैराण झाली ऐश्वर्या राय, अभिनेत्री थेट म्हणाली…
Aishwarya Rai big statement : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये तिने हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. ऐश्वर्या रायचे खासगी आयुष्यही चर्चेत राहिलेले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय ही लवकरच अभिषेक बच्चन याच्यासोबत घटस्फोट घेणार असल्याचे सातत्याने सांगितले जातंय. हेच नाही तर यांच्यातील वाद टोकाला गेल्याची चर्चा आहे. अनंत अंबानीच्या लग्नामध्येही ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबियांसोबत सहभागी झाली नव्हती, ती मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत या लग्नात दाखल झाली. सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. परंतू यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य करत नाहीये.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न 2007 मध्ये झाले. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी आपल्या नावासमोर बच्चन हे नाव लागले, त्यावेळी ऐश्वर्या राय ही हैराण झाली होती. याबद्दलचा खुलासा स्वत: ऐश्वर्या राय हिने केला आहे, ज्याची आता चर्चा होताना दिसत आहे.
ज्यावेळी ऐश्वर्या राय बच्चन असे तिला म्हटले गेले, त्यावेळी ती हैराण झाली. ऐश्वर्या राय म्हणाली की, रेग्युलर फक्त ऐश्वर्या…जसे तुम्ही मला अगोदरपासून ओळखतात…त्यानंतर ऐश्वर्या राय हिला विचारण्यात आले की, लग्नानंतर ऑफिशियली तुझे नाव ऐश्वर्या राय बच्चन असणार का? यावर उत्तर देताना ऐश्वर्या राय ही म्हणाली की, ऐश्वर्या राय नेहमीच माझे ऑफिशियली नाव राहिले आहे.
पण लग्नानंतर ऐश्वर्या राय बच्चन झाले. तशी ऐश्वर्या राय हिची ही मुलाखत जुनीच आहे, जी आता सध्या चर्चेत आहे. इंस्टाग्रामवर देखील ऐश्वर्या राय हिने आपल्या नावासमोर पतीचे आडनाव लावलेले आहे. दुसरीकडे जया बच्चन या पतीचे नाव आपल्या नावासमोर लावल्याने चांगल्याच भडकल्याचे बघायला मिळतंय.
जया अमिताभ बच्चन असे नाव घेतल्याने त्या भडकल्या. महिलेची एक स्वतंत्र ओळख असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता तोच मुद्दा चांगलाच गाजताना दिसतोय. ऐश्वर्या राय ही काही दिवसांपूर्वीच विदेशात गेली होती. मुंबई विमानतळावरील ऐश्वर्या राय हिचे खास फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.