ऐश्वर्या राय हिचा ‘तो’ सेल्फी व्हायरल, घटस्फोटाच्या चर्चांमध्येच अभिनेत्री…
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग आहे. ऐश्वर्या राय हिच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे सांगितले जातंय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक लवकरच घटस्फोट घेत असल्याची चर्चा आहे.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या रायने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही ऐश्वर्या राय चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा जोरदार रंगताना दिसत आहे की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये जोरदार वाद सुरू असून लवकरच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार आहे. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातही ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत पोहोचली होती. बच्चन कुटुंब स्वतंत्र पोहोचले होते. अनंत अंबानीच्या लग्नानंतर लगेचच ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत विदेशात निघाली. यावेळीचे काही फोटोही व्हायरल होताना दिसले.
आता ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन या भारतामध्ये परत आल्या आहेत. नुकताच काही खास फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे व्हायरल होणारे फोटो ऐश्वर्या राय हिने घेतले आहेत. मुलगी आराध्या बच्चन आणि एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसोबत सेल्फी घेताना ऐश्वर्या राय ही दिसत आहे.
View this post on Instagram
विशेष म्हणजे या फोटोमध्ये ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन या जबरदस्त लूकमध्ये दिसत आहेत. आता हेच फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय हिने घेतलेले हे सेल्फी चाहत्यांना चांगलेच आवडताना दिसत आहेत. हेच नाही तर एअरपोर्टवर पापाराझी यांच्यासोबत बोलताना देखील ऐश्वर्या राय दिसली.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे खरोखरच घटस्फोट घेणार का? हा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय. मात्र, यावर कोणीही भाष्य करत नाहीये. रिपोर्टनुसार ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडले असून ती तिच्या आईच्या घरी शिफ्ट झालीये. ऐश्वर्या राय हिने चेहऱ्याची सर्जरी केल्याचीही चर्चा रंगताना दिसत आहे.