Alia Bhatt | लंडनपासून ते मुंबईपर्यंत आहेत आलिया भट्ट हिचे आलिशान बंगले, अभिनेत्री आहे कोट्यावधी संपत्तीची मालकीन, थेट
आलिया भट्ट ही कायमच चर्चेत राहणारी बाॅलिवूड अभिनेत्री आहे. आलिया भट्ट हिने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. आलिया भट्ट हिची तगडी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही आज कोट्यावधी संपत्तीची मालकीन आहे. करण जोहर यानेच आलिया भट्ट हिला बाॅलिवूडमध्ये लाॅन्च केले आहे. आलिया भट्ट हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. आलिया भट्ट ही सध्या बाॅलिवूडच्या (Bollywood) टाॅप अभिनेत्रींपैकी एक नक्कीच आहे. आलिया भट्ट हिने काही दिवसांपूर्वीच मुलीला जन्म दिला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या मुलीची एकही झलक आपल्या चाहत्यांना दाखवली नाहीये.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले. आलिया भट्ट ही सोशल मीडियावरही चांगली सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट ही मुलगी राहा हिला घेऊन करीना कपूर खान हिच्या घरी पोहचली. याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. या व्हिडीओमध्ये तैमुर अली खान हा देखील दिसत होता.
आलिया भट्ट ही चित्रपटांसाठी तगडी फिस घेते. इतकेच नाही तर आलिया भट्ट हिची मोठी संपत्ती आहे. फक्त भारतामध्येच नाही तर विदेशात देखील आलिया भट्ट हिची संपत्ती बघायला मिळते. लंडनच्या अत्यंत महागड्या परिसरात आलिया भट्ट हिचे घर आहे. या घराची किंमत आज कोट्यावधीच्या घरात आहे.
आलिया भट्ट हिचे एकून नेटवर्थ 517 कोटी असल्याचे सांगितले जाते. 2018 मध्ये आलिया भट्ट हिने लंडनमध्ये घर खरेदी केले. लंडनमध्ये आपल्या स्वत:च्या मालकीचे घर असावे हे आलिया भट्ट हिचे फार पूर्वीपासून स्वप्न होते. कोरोनाच्या काळातही आलिया भट्ट हिने मुंबईच्या बांद्रा परिसरात तब्बल 40 कोटींची आलिशान संपत्ती खरेदी केली.
पाली हिल्स कॉम्प्लेक्समध्ये फक्त आलिया भट्ट हिचेच नाही तर रणबीर कपूर याचेही घर आहे. याची किंमत आज कोट्यावधीच्या घरात आहे. आलिया भट्ट हिचे जुहू परिसरात देखील एक आलिशान घर असल्याचे सांगितले जाते. आलिया भट्ट हिच्याकडे लग्झरी गाड्यांचे देखील मोठे कलेक्शन आहे.
विशेष बाब म्हणजे आलिया भट्ट ही फक्त एक अभिनेत्री नसून तिचे अनेक व्यवसाय देखील आहेत. त्यामधूनही आलिया भट्ट ही मोठा पैसा कमावते. आलिया भट्ट हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख ही बाॅलिवूडमध्ये निर्माण केलीये. आतापर्यंतच्या करिअरमध्ये आलिया भट्ट हिला अनेक पुरस्कार हे देखील मिळाले आहेत. आलिया भट्ट हिची जबरदस्त फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.