Alia Bhatt ची मुंबईतच नाही तर, परदेशात गडगंज संपत्ती, नेटवर्थ जाणून व्हाल थक्क

Alia Bhatt | करण जोहर याची 'स्टुडंन्ट' गडगंज संपत्तीची मालकीण... मुंबईतच नाही तर, परदेशात देखील आलिशान घर, महागड्या गाड्या आणि बरंच काही...

Alia Bhatt ची मुंबईतच नाही तर, परदेशात गडगंज संपत्ती,  नेटवर्थ जाणून व्हाल थक्क
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 12:23 PM

मुंबई : 9 सप्टेंबर 2023 | अभिनेता आलिया भट्ट बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. २०१२ मध्ये ‘स्टूडन्ट ऑफ द ईयर’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या आलियाने अनेक विक्रम रचले आहेत. शिवाय अभिनेत्रीला अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं आहे. ‘डियर जिंदगी’,’ हायवे’, ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘राझी’ फेम आलिया हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलिया भट्ट हिची चर्चा रंगत आहे. आलिया फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर रॉयल लाईफ स्टाईलमुळे देखील तुफान चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री गडगंड संपत्तीची मालकीण आहे. आलिया हिची संपत्ती फक्त मुंबई याठिकाणीच नाही तर साता समुद्रापार परदेशात देखील आहे.

रिपोर्टनुसार, आलिया भट्ट एका सिनेमासाठी तब्बल १० कोटी रुपयांचं मानधन घेते. भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री म्हणून देखील आलिया भट्ट हिची ओळख आहे. आलिया भट्ट हिच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीकडे तब्बल ५१७ कोटी रुपयांचा संपत्ती आहे. सध्या सर्वत्र आलिया भट्ट हिच्या संपत्तीची चर्चा रंगत आहे.

एका मुलाखतीत आलिया भट्ट हिने सांगितलं होतं की, लंडनमध्ये स्वतःचं घर असावं. २०१८ मध्ये लंडन येथील कोव्हेंट गार्डनमध्ये २५ कोटी रुपयांचं घर घेत आलिया हिने स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं. लंडन येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये अभिनेत्रीने घर घेतलं आहे. त्यानंतर अभिनेत्रीने २०२० मध्ये मुंबईमध्ये वांद्रे याठिकाणी घर विकत घेतलं. पाली हिल्स याठिकाणी अभिनेत्रीचं घर आहे. पाली हिल्स कॉम्प्लेक्समध्ये अभिनेत्रीचं घर पाचव्या मजल्यावर आहे, तर सातव्या मजल्यावर रणबीर कपूर याचं घर आहे.

हे सुद्धा वाचा

आलिया भट्ट हिच्याकडे महागड्या गाड्याचं कलेक्शन

आलिया भट्ट हिच्याकडे महागड्या गाड्याचं कलेक्शन आहे. तिच्याकडे रेंज रोव्हर आणि BMW 7 सीरीजची किंमत 2.5 कोटी रुपये आहे. अभिनेत्रीकडे तीन ऑडी देखील आहेत, त्यापैकी दोन एसयूव्ही आहेत आणि दुसरी सेडान ऑडी A6 आहे. मुंबईत अभिनेत्रीचे तीन घर आहेत.

आलिया भट्ट हिचे उद्योग

आलिया भट्ट एक यशस्वी स्टार तर आहेच पण तिने उद्योग क्षेत्रात देखील पदार्पण केलं आलं. Add-A-Mamma नावाच्या प्रसिद्ध कपड्यांच्या ब्रँडची ती मालक आहे. नुकताच आलियाने इशा अंबानीसोबत तिच्या कपड्यांच्या व्यवसायाची घोषणा केली होती. आलिया भट्ट 2019 पासून इटर्नल सनशाइन प्रॉडक्शन नावाच्या प्रॉडक्शन हाऊसच्या मालकीची आहे.

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.