Gangubai Kathiwadi : बहुप्रतिक्षित ‘गंगुबाई काठियावाडी’चा ट्रेलर आऊट, प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद, दोन तासात दीड मिलियन पार

आलिया भटचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा ट्रेलर सध्या प्रदर्शित झालाय. या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळतोय.

Gangubai Kathiwadi : बहुप्रतिक्षित 'गंगुबाई काठियावाडी'चा ट्रेलर आऊट, प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद, दोन तासात दीड मिलियन पार
गंगूबाई काठियावाडी
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 2:36 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटचा (Bollywood Actress Alia Bhatt) आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाचा ट्रेलर सध्या प्रदर्शित झालाय. या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळतोय. यूट्यूबवर आतापर्यंत या ट्रेलरला दीड मिलियनहून अधिक Views मिळाले आहेत. ट्रेलरवर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना आलियाचा लुक आवडलाय तर काहींनी तिच्या अभिनयाची तारिफ केलीये. “आलियाने उत्तम काम केलंय,” असं एकाने म्हटलंय तर “आलियाला याआधी रोमॅन्टिक सीन करताना पाहिलं आहे. आता तिने ही बोल्ड भूमिकाही उत्तम प्रकारे साकारली आहे”, असं दुसऱ्याने म्हटलंय. आधी हा सिनेमा 6 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

आलियाचा बोल्ड लुक

आलिया भट्टच्या या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटात आलिया मुंबईची माफिया क्वीन गंगूबाईची भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटात अजय देवगण या चित्रपटात गँगस्टर करीम लालाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आलियाचा बोल्ड लुक सगळ्यांना पाहायला मिळतोय. दमदार संवादांमुळे आलिया प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेते.

संजय लीला भन्साळी यानी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटावरून वादही निर्माण झाला होता. गंगूबाईंच्या कुटुंबातील काही लोकांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. संजय लिला भन्साळी यांचा चित्रपट आणि त्यावरून होणारा वाद याला मोठा इतिहास आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडतो. याआधीही पद्मावत हा त्यांचा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

चित्रपट 25 फेब्रुवारीला रिलीज होणार

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि चित्रपटातील इतर कलाकारंना कोरोना झाला होता. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होण्यास प्रचंड वेळ लागला होता. या आधी हा सिनेमा 6 जानेवारी प्रदर्शित होणार होता मात्र आता हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

कालच लग्नाचा वाढदिवस साजरा, आज पोस्टर शेअर करत रितेश-जिनिलियाची ‘गुडन्यूज’

Madhubala | मधुबालाच्या बहिणीला सुनेने घराबाहेर हाकललं, 96 व्या वर्षी वणवण

बच्चन परिवारावर पुन्हा संकट, जया बच्चन यांना कोरोनाची लागण, करण जोहरने सिनेमाचं शूटिंग थांबवलं

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.