मैत्रिणीच्या नवऱ्याला गुपचूप भेटायची ही अभिनेत्री, लग्न करत बॉलिवूडला दिला मोठा धक्का

बॉलीवूडमध्ये ग्लॅमरस, बोल्ड आणि स्पष्टवक्ते अभिनेत्रींचा उल्लेख होतो. तेव्हा एका अभिनेत्रीचे नाव नक्की घेतले जाते. पण ही अभिनेत्री कामापेक्षा इतर गोष्टींमुळे जास्त चर्चेत राहिली. तिचे अफेअर देखील चर्चेत राहिले. तिचे एका क्रिकेटरसोबत अफेअर देखील होते. पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले, नंतर या अभिनेत्रीने आपल्यास मैत्रिनीच्या नवऱ्याशी विवाह केला.

मैत्रिणीच्या नवऱ्याला गुपचूप भेटायची ही अभिनेत्री, लग्न करत बॉलिवूडला दिला मोठा धक्का
Follow us
| Updated on: Sep 16, 2024 | 8:11 PM

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील यांचंं काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. इमारतीवरुन उडी मारुन त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे कुटुंब चर्चेत आहे. पण सध्या मलायका अरोराची बहीण अमृता हिची देखील सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. अमृता अरोराने तिच्या करिअरची सुरुवात ‘कितने दूर कितने पास’ या चित्रपटातून केली होती. ‘आवारा पागल दीवाना’ या चित्रपटातून अमृताला खूप प्रसिद्धी मिळाली होती. पण तिचे करिअर इतके यशस्वी ठरले नाही. पण तिच्या लव्हस्टोरीने संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला होता.

अमृता अरोराला तिच्या करिअरमध्ये यश मिळू शकले नाही. अनेक फ्लॉप चित्रपटांमुळे तिची कारकीर्द संपुष्टात आली. ती बॉलिवूड इंडस्ट्रीत फ्लॉप ठरली. पण ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली. शकील लडाकसोबत तिचे नाव जोडले गेले.

अमृता अरोरा शकील लडक लव्ह स्टोरी

शकील हा कंस्ट्रक्शन कंपनीचा डायरेक्टर आणि अमृताची मैत्रिण निशा हिचा नवरा होता. रिपोर्ट्सनुसार, शकील आणि अमृता यांच्यातील अफेअर येथूनच सुरू झाले होते. काही वर्षांनी शकीलने पत्नी निशा हिला घटस्फोट देऊन अमृताशी लग्न केले. यामुळे निशाने अमृतावर घर फोडल्याचा आरोपही केला होता.

अमृताचा उल्लेख तिच्या अभिनयापेक्षा तिच्या अफेअरबद्दल जास्त केला जातो. 31 जानेवारी 1981 रोजी जन्मलेल्या अमृताने 2003 मध्ये 22 व्या वर्षी करिअरला सुरुवात केली होती. ती आधी व्हिडिओ जॉकी म्हणून काम करत होती. 2004 मध्ये इंग्लंड संघाचा क्रिकेटर उस्मान अफझलसोबत तिचे नाव जोडले गेल्याने ती चर्चेत आली होती. त्यावेळी उस्मान इंग्लंड संघासोबत भारतात आला होता आणि तो अमृता अरोराच्या प्रेमात पडला होता. पण 2006 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.

2008 मध्ये एका मुलाखतीत अमृताने स्वतः सांगितले होते की, तिचे उस्मानवर प्रेम होते. उस्मानमुळेच क्रिकेट माझे दुसरे प्रेम बनले होते. 2009 मध्ये अमृताने तिचा कॉलेज फ्रेंड शकील लडाकशी लग्न केले, जो एक मोठा उद्योगपती आहे. शकीलचे आधी निशासोबत लग्न झाले होते, पण अमृता अरोरासोबत जवळीक वाढल्यानंतर त्याने ते नाते संपुष्टात आणले.

पण सध्या अमृता आणि मलायका अरोरा या दोघीही वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर चर्चेचा विषय बनल्या आहेत. खरे तर काही दिवसांपूर्वीच वडिलांनी सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी आली होती. तेव्हापासून अमृत आणि मलायका दोघेही लाइमलाइटमध्ये दिसत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.