‘बलात्कार तो करते हैं पर रोटी…’, इंडस्ट्रीबद्दल खासदार महिलेचं धक्कादायक वक्तव्य

Kangana Ranaut on exploitation in bollywood: 'बलात्कार तो करते हैं पर रोटी...', इंडस्ट्रीमध्ये महिलांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल खासदार महिलेचं धक्कादायक वक्तव्य, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त खासदार महिलेच्या वक्तव्याची चर्चा...

'बलात्कार तो करते हैं पर रोटी...', इंडस्ट्रीबद्दल खासदार महिलेचं धक्कादायक वक्तव्य
Follow us
| Updated on: Sep 17, 2024 | 3:57 PM

बॉलिवूडमध्ये घडणाऱ्या सर्व घटना सर्वांसमोर येत आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक रहस्य आहेत, जे अद्यापही गुलदस्त्यात आहेत. त्यापैकी एक म्हणजे महिलांवर होणारे अत्याचार… पूर्वी झगमगत्या विश्वात काम करणाऱ्या महिली प्रतिष्ठा नष्ट होईल म्हणून काही बोलत नव्हत्या. पण आता अभिनेत्री त्यांना आलेले वाईट अनुभव चाहत्यांसोबत शेअर करतात. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी बॉलिवूडबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रणौत यांच्या वक्तव्याची चर्चा…

इंडस्ट्रीत महिलांचे शोषण होत असल्याचं कंगना राणौत यांचं म्हणणं आहे. कंगना राणौत म्हणाल्या, ‘तुम्हाला माहिती आहे इंडस्ट्रीमध्ये महिलांचं शोषण कसं होतं? ही लोकं आधी महिलांना घरी डीनरसाठी बोलावतात. कोलकाता बलात्कार प्रकरणच बघा. मला अनेकदा बलात्काराच्या धमक्याही आल्या आहेत.’

‘महिलांना आदर मिळत नाही. इंडस्ट्रीमधील चित्र देखील असंच आहे. इंडस्ट्रीमध्ये देखील महिलांना आदर मिळत नाही. कॉलेजची मुले महिलांवर कमेंट करतात. अभिनेते देखील असंच करतात. कामच्या ठिकाणी महिलांसोबत काय होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे.’ असं देखील कंगना राणौत म्हणाल्या.

सरोज खान यांनी सांगितलेलं ‘ते’ वाक्य

कंगना यांनी दिवंगत कोरिओग्राफर सरोज खान यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली. ‘एकदा सरोज खान यांना चित्रपटसृष्टीतील बलात्कार आणि लैंगिक छळाबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा सरोज खान म्हणाल्या होत्या, ‘बलात्कार तो करते हैं पर रोटी भी देते हैं… सिनेविश्वात आमच्या मुलींची अवस्था अशीच आहे…’ असं देखील सरोज खान म्हणाल्या होत्या.

कंगना रणौत यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, कंगना राणौत स्टारर Emergency सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सध्या कंगना सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्री अनेक मोठ्या आणि धक्कादायक गोष्टींचा खुलासा करत आहे.

खासदार कंगना राणौत

कंगना राणौत यांनी हिमाचल येथील मंडी मतदार संघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि खासदर झाल्या. राजकारणात प्रवेश केल्यामुळे कंगना चर्चेत असतात. कंगना कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असतात.

'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.