कंगना रणौतचं तरुण खासदाराबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाली, ‘मला पाहिल्यानंतर ते आता…’

Kangana Ranaut: 'मला पाहिल्यानंतर ते आता...', , 'त्या' तरुण खासदाराबद्दल अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, खासदार झाल्यानंतर कंगनाच्या आयुष्यात झालेत मोठे बदल, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रणौत यांची चर्चा...

कंगना रणौतचं तरुण खासदाराबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाली, 'मला पाहिल्यानंतर ते आता...'
Follow us
| Updated on: Aug 31, 2024 | 11:21 AM

बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत स्टारर Emergency सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सध्या कंगना सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. सिनेमासाठी अनेक ठिकाणी मुलाखती देखील देत आहेत. दरम्यान, एका मुलाखतीत कंगना यांनी खासदार चिराग पासवान यांच्याबद्दल विचारण्यात आलं. सांगायचं झालं तर, कंगना रणौत आणि चिराग पासवान यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

चिराग – कंगना यांचे फक्त फोटो – व्हिडीओ व्हायरल झाले नाहीत तर, दोघांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा देखील रंगल्या. अशात नुकताच झालेल्या मुलाखतीत कंगना यांनी चिराग पासवान यांच्यासोबत व्हायरल झालेल्या फोटोबद्दल विचारण्यात आलं. यावर अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे.

चिराग पासवान यांच्याबद्दल कंगना म्हणाल्या, ‘कमीत कमी आम्हाला संसदेत तरी सोडा… मी चिराग यांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखते. आम्ही चांगले मित्र आहोत. त्यांनी मला एक – दोनवेळा विनोदाने हसवलं आहे. तेव्हापासून अनेक चर्चा रंगल्या आहेत. आता मला पाहिल्यानंतर चिराग स्वतःच रस्ता बदलतात…’ असं देखील कंगना म्हणाल्या.

चिराग पासवान यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, चिराग पासवान मोदी सरकारमधील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री आहेत. कॅबिनेट मंत्री चिराग पासवान आहेत. लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि हाजीपूरचे लोकसभा खासदार चिराग पासवान हे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनले आहेत.

चिराग पासवान यांनी अभिनय विश्वात देखील स्वतःचं नशीब आजमावलं होतं. ‘मिले ना मिले हम’ सिनेमात चिराग पासवान झळकले होते. सिनेमात चिराग पासवान यांच्यासोबत अभिनेत्री कंगना रनौत यांनी भूमिका साकारली होती. 2011 मध्ये सिनेमा प्रदर्शित झाला होता. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला.

चिराग – कंगना यांचा सिनेमा तेव्हा फ्लॉप ठरला पण दोघांनी देखील खासदारकीची शपथ घेतल्यानंतर सोशल मीडियावर सिनेमातील अनेक सीन व्हायरल झाले. चिराग पासवान यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ते रामविलास पासवान यांचे पूत्र आहेत.

'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....