होय, माझ्या कानाखाली मारली, शिवीगाळ केली आणि… कंगना राणावतची पहिली प्रतिक्रिया व्हायरल

कंगना राणावत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. नुकताच कंगना राणावत हिने लोकसभा निवडणूक लढली आहे. कंगना राणावत ही मोठ्या लीडने निवडूण आलीये. कंगना राणावत हिच्यासोबत एक अत्यंत हैराण करणारा प्रकार घडलाय. यामुळे आता विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.

होय, माझ्या कानाखाली मारली, शिवीगाळ केली आणि... कंगना राणावतची पहिली प्रतिक्रिया व्हायरल
Kangana Ranaut
Follow us
| Updated on: Jun 06, 2024 | 7:16 PM

खासदार आणि बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्यासोबत एक अत्यंत हैराण करणारी घटना घडलीये. या घटनेनंतर मोठी खळबळ बघायला मिळतंय. कंगना राणावतने नुकताच लोकसभा निवडणूक मंडी येथून जिंकलीये. विशेष म्हणजे कंगना राणावत हिने ही निवडणूक मोठ्या लीडने जिंकली आहे. चंदीगड विमानतळावर कंगना राणावत हिच्यासोबत हैराण करणारा प्रकार घडलाय. चंदीगडवरून दिल्लीला जाण्यासाठी कंगना ही विमानतळावर पोहचली होती. यावेळी चक्क सीआयएसएफ गार्ड महिलेने तिच्या कानाखाली लावली. या घटनेनंतर मोठा संताप व्यक्त केला जातोय. याचा एक व्हिडीओही व्हायरल होताना दिसला.

या सर्व धक्कादायक प्रकारानंतर आता कंगना राणावत हिने एक व्हिडीओ तयार केलाय. घडलेल्या प्रकाराबद्दल बोलताना कंगना राणावत ही दिसली आहे. यासोबतच कंगना राणावत हिने नेमके काय घडले हे देखील व्हिडीओमध्ये स्पष्ट सांगितले आहे. आपण सुरक्षित असल्याचे कंगना राणावतने म्हटले. हेच नाही तर आपल्या कानाखाली मारण्यात आल्याचीही कबुली तिने दिलीये.

कंगना राणावत हिने व्हिडीओमध्ये म्हटले की, नमस्कार सर्वांना..मला अनेक फोन येत आहेत. माझ्या जवळच्या व्यक्तींचे आणि मीडियाचे पण. पुढे कंगना राणावत म्हणाली की, सर्वात पहिले म्हणजे मी सुरक्षित आहे. आज जी घटना घडली ती, चंदीगड विमानतळावर सेक्युरिटी चेक वेळी घडली. मी सेक्युरिटी चेक करून निघत होते.

त्याचवेळी दुसऱ्या कॅबिनमध्ये असलेली सुरक्षारक्षक सीआयएसएफ गार्ड महिला माझ्याकडे आली आणि तिने माझ्या कानाखाली मारली, त्यानंतर तिने शिवीगाळ करण्यासही सुरूवात केली. त्यानंतर मी तिला विचारले की, तिने असे का केले तर ती शेतकरी आंदोलनाला समर्थन करते म्हणाली. मी सुरक्षित आहे, परंतू पंजाबमध्ये जो दहशतवाद आणि उग्रवाद कसा हाताळायचा ही माझी चिंता आहे.

आता कंगना राणावत हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. कंगना राणावत हिच्यासोबत घडलेल्या या प्रकारानंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण देखील बघायला मिळतंय. कंगना राणावत हिचा विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल होतोय. सतत या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.