मुंबई | बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री ज्यांचं नाव प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण अभिनेत्रींच्या आयुष्यात वैवाहिक जीवनाचा आनंद फार काळ टिकला नाही. अखेर अभिनेत्रीना प्रेमात ब्रेकअपचा सामना करावा लागला, तर काही अभिनेत्रींना मात्र घटस्फोटाचा… पण बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे. जिचं प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न तुटलं. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री संगीता बिजलानी आहे. सलमान आणि संगीता यांची ओळख एका हेल्थ सेंटरमध्ये झाली होती. ओळख झाल्यानंतर दोघांच्या भेटी वाढत होत्या.
भेटींच रुपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मेत्रीचं प्रेमात. पण सलमान आणि संगीता यांचं नातं देखील जास्त काळ टिकू शकलं नाही. संगीताला १० वर्ष डेट केल्यानंतर सलमानच्या आयुष्यात सोमी अली हिची एन्ट्री झाली आणि संगीतोसोबत भाईजानचं ब्रेकअप झालं.
सलमान याच्यापासून विभक्त झाल्यानंतर संगीता बिजलानी हिने माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं लग्न देखील जास्त काळ टिकू शकलं नाही. आता अनेक वर्षांनंतर सलमान खान याच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये संगीता उपस्थित असते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, १९८५ मध्ये मोहम्मद अझरुद्दीन आणि संगीता बिजलानी यांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. संगीता हिला पाहताचं अजहरुद्दीन अभिनेत्रीवर फिदा झाले. पण तेव्हा अजहरुद्दीन विवाहित होते आणि त्यांना दोन मुलं देखील होती. पण अजहरुद्दीन, संगीताच्या प्रेमात पूर्ण बुडाले होते.
संगीता हिच्यासोबत लग्न करण्यासाठी अजहरुद्दीन यांनी १९९६ साली पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि संगीता हिच्यासोबत लग्न केलं. संगीता आणि अजहरुद्दीन यांचं लग्न जवळपास १४ वर्ष टिकलं. २०१० मध्ये संगीता आणि अजहरुद्दीन यांनी विभक्त व्हायचा निर्णय घेतला.
आज वयाच्या ६३ व्या वर्षी अभिनेत्री एकटं आयुष्य जगत आहे. पण अभिनेत्रीला अनेक एक्स बॉयफ्रेंड सलमान खान याच्यासोबत स्पॉट करण्यात आलं आहे. संगीता आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते शिवाय तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी देखील तरुणींना लाजवेल असं अभिनेत्रीचं सौंदर्य आहे.