विराट कोहली आणि अनुष्का शर्मा विदेशात स्थायिक होण्याच्या चर्चांमध्येच अत्यंत मोठे अपडेट, अभिनेत्री म्हणाली…
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. हेच नाही तर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे विदेशात शिफ्ट होणार असल्याचे सांगितले जाते. मुलगा अकाय याला देखील अनुष्का शर्मा हिने विदेशातच जन्म दिलाय, मुलाची झलक अजूनही विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी दाखवली नाहीये.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. अनुष्का शर्मा हिने काही दिवसांपूर्वीच लंडनमध्ये मुलाला जन्म दिलाय. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुलगा झाल्याचे सांगितले, यासोबतच त्यांनी मुलाच्या नावाची घोषणा केली. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांच्या मुलाचे नाव अकाय ठेवलंय. अनुष्का शर्मा ही सध्या लंडनमध्येच आपल्या कुटुंबासोबत आहे. T20 सामना जिंकल्यानंतर टीमसोबत विराट कोहली हा भारतामध्ये दाखल झाला. मात्र, त्याच रात्री परत तो लंडनला गेला. विराट आणि अनुष्का हे आपल्या कुटुंबासोबत खास वेळ घालवताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मा हिने इंस्टा स्टोरीवर नाश्त्याची एक प्लेट शेअर केली. त्यामध्ये विविध फळे दिसली. हेच नाही तर अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लंडनमध्ये स्पॉट देखील झाले. अनुष्का शर्मा हिने रक्षाबंधनला खास दोन राख्या देखील शेअर केल्या होत्या. अकाय याचे हे पहिलेच रक्षाबंधन आहे.
आता अनुष्का शर्मा हिने एक पोस्ट शेअर केलीये. त्या पोस्टनंतर एक अंदाजा लावला जातोय की, अनुष्का शर्मा ही भारतामध्ये येत आहे. अनुष्का शर्मा ही एका कार्यक्रमासाठी भारतात येत आहे. अनुष्का शर्मा हिने इंस्टा स्टोरीवर पोस्ट शेअर करत लिहिले की, तुम्हाला लवकरच मी भेटेल. अनुष्का शर्मा हिची ही पोस्ट पाहून अशी चर्चा आहे की, ती मुंबईमध्ये येत आहे.
अनुष्का शर्मा हिने ज्या कार्यक्रमाबद्दल टाकले आहे तो कार्यक्रम मुंबईमध्येच होणार आहे. अनुष्का शर्मा ही अकायच्या जन्मानंतर एकदा मुंबईमध्ये येऊन गेलीये. मात्र, त्यानंतर लगेचच ती लंडनला परत गेली. आता अनुष्का शर्मा ही भारतात राहण्यासाठी येणार की, परत लंडनला वापस जाणार हे चाहत्यांकडून विचारले जातंय.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे कायमच विदेशात शिफ्ट होणार असल्याचे सातत्याने सांगितले जातंय. मात्र, यावर अनुष्का शर्मा किंवा विराट कोहली यांच्याकडून काहीच भाष्य करण्यात आले नाहीये. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांच्या मुलाची झलक चाहत्यांनान अजून दाखवली नाहीये. हेच नाही तर वांमिका हिची देखील झलक चाहत्यांना दाखवली नाहीये.