अनुष्का शर्मा आणि वामिकामध्ये स्पर्धा, अभिनेत्रीने शेअर केला ‘तो’ फोटो, विराट कोहलीची लेक..
अभिनेत्री अनुष्का शर्मा ही गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपासून दूर दिसत आहे. मात्र, असे असतानाही अनुष्का शर्मा सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही अनुष्का शर्मा चांगलीच सक्रिय दिसत आहे. नुकताच शेअर केलेल्या एका फोटोमुळे अनुष्का सध्या चर्चेत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर सध्या चांगलीच सक्रिय दिसतंय. गेल्या काही वर्षांपासून अनुष्का शर्मा ही चित्रपटांपासून दूर आहे. झिरो चित्रपटात शाहरूख खान याच्यासोबत अनुष्का शर्मा शेवटी दिसली. झिरो चित्रपट फ्लॉप गेल्यापासून ती चित्रपटांमध्ये दिसली नाहीये. हेच नाही तर सध्या कोणत्याच चित्रपटाचे शूटिंगही अनुष्का शर्मा करत नाहीये. अनुष्का शर्मा ही सध्या फक्त आणि फक्त कुटुंबाला वेळ देताना दिसत आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या मुलीचे नाव वामिका आणि मुलाचे नाव अकाय आहे. काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मा हिने लंडनमध्ये मुलाला जन्म दिलाय.
मुलाच्या जन्मानंतर अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे लंडनमध्येच राहणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली, मात्र, काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मा ही भारतामध्ये परतलीये. आता अनुष्का शर्मा हिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. हा फोटो तूफान व्हायरल होताना दिसतोय आणि चर्चेचा विषय ठरलाय.
अनुष्का शर्मा हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये बोर्ड दिसत आहे. यावर एका बाजूला वामिकाचे नाव आहे तर दुसऱ्या बाजूला अनुष्काचे नाव आहे. यामध्ये दोन्ही नावाच्या खाली चित्रे काढण्यात आली आहेत. हेच नाही तर मायलेकीमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. अनुष्का आणि वामिका या दोघींनी चित्रे काढली. अनुष्का शर्माने फुलाच्या झाडाचे चित्र काढले आहे.
दुसरीकडे वामिकाने देखील चित्र काढल्याचे दिसत आहे. आता हेच फोटो व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा ही वामिका हिच्यासोबत लहान मुलगी बनून धमाल करताना दिसली. हेच नाही तर वामिकाच्या आवडतीचे आईस्क्रीम खातानाही अनुष्का दिसली.
फक्त अनुष्का शर्मा हीच नाही तर विराट कोहली हा देखील वामिकाला आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ देताना दिसतो. काही दिवसांपूर्वी विराट कोहली आणि वामिका यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. या फोटोमध्ये वामिका वडिलांसोबत एका विदेशातील हॉटेलमध्ये बसून जेवण करताना दिसली होती. हा मागच्या बाजूने फोटो काढण्यात आला होता.