Bipasha Basu | ‘अशी वेळ कोणत्याच आईवर नको…’, बिपाशाच्या मुलीचं सहा तास ऑपरेशन, त्यानंतर…

डॉक्टरांनी लेकीच्या प्रकृतीबद्दल सांगितल्यानंतर बिपाशा बासू हिला बसला मोठा धक्का; अभिनेत्रीने मुलीच्या आरोग्याबद्दल दिली मोठी माहिती

Bipasha Basu | 'अशी वेळ कोणत्याच आईवर नको...', बिपाशाच्या मुलीचं सहा तास ऑपरेशन, त्यानंतर...
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 12:56 PM

मुंबई | 6 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर यांनी १२ नोव्हेंबर २०२२ मध्ये मुलीचं जगात स्वागत केलं. बिपाशा आणि करण यांनी त्यांच्या लेकीचं नाव देवी बासू ग्रोव्हर असं ठेवलं आहे. मुलीच्या जन्मानंतर एक खास पोस्ट शेअर करत बिपाशा हिने चाहत्यांसोबत आनंद शेअर केला. पण जेव्हा देवीचा जन्म झाला तेव्हा ती वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट (VSD) या आजाराने त्रस्त होती. अभिनेत्री नेहा धुपियासोबत इंस्टाग्राम लाइव्हवर नुकत्याच झालेल्या मुलाखतीदरम्यान, बिपाशा हिने भावूक होत मुलीच्या प्रकृतीबद्दल धक्कादायक माहिती चाहत्यांसोबत शेअर केली.

मुलीच्या हृदयात दोन छिद्रे आहेत.. असं डॉक्टरांनी अभिनेत्रीला सांगितलं. हृदयात दोन छिद्रे असल्यामुळे बिपाशाची मुलगी तीन महिन्यांची असताना तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मुलीच्या आरोग्याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली, ‘आमचा प्रवास सामान्य आई-वडिलांप्रमाणे नव्हता. मी आता आनंदी दिसत आहे. पण तो काळ माझ्यासाठी फार कठीण होता.’

‘कोणत्याच आईवर अशी वेळ यायला नको. मला ही गोष्ट कोणासोबत शेअर करायची नव्हती. पण अनेक माता आहेत ज्यांनी माझी मदत केला. त्यांचा शोध घेणं आता कठीण आहे. व्हीएसडी काय असतं हे देखील मला माहिती नव्हतं. आम्ही दोघांनी कुटुंबियांना काहीही सांगितलं नव्हतं. थोडे घाबरलो होतो. देवीच्या जन्मानंतर पाच महिने आमच्यासाठी फार कठीण होते…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझी देवी पहिल्यापासून दमदार होती. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की, छिद्रे बरे होत आहेत की नाही.. याची प्रत्येक महिन्याला तपासणी करावी लागेल. पण तिच्या हृदयात असलेल्या छिद्रांचा आकार वाढत होता. तेव्हा डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. देवी तीन महिन्यांची झाल्यानंतर ऑपरेशन करा असं डॉक्टारांनी सांगितलं..

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘आम्हाला वाटलं बरं होवून जाईल. पहिल्या महिन्यात काही झालं नाही. दुसरा महिना देखील चांगला होता. पण तिसऱ्या महिन्यात तपासणीसाठी गेलो तेव्हा आम्हाला धक्का बसला. अनेक सर्जन डॉक्टरांकडून आम्ही सल्ला घेतला. ऑपरेशनसाठी करण कयार नव्हता. माझ्या मुलीवर योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी ऑपरेश कसं झालं पहिजे हे कठीण होतं.’

बिपाशाने सांगितले की, देवी तीन महिन्यांची असताना ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशन सहा तास सुरु होतं. जेव्हा देवी ऑपरेशन थिएटरमध्ये होती मी पूर्ण घाबरली होती. पण आता देवीची प्रकृती उत्तम आहे.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.