Deepika Padukone | दीपिका पादुकोण हिच्या निशाण्यावर नेमके कोण? थेट म्हणाली, ग्लोबल स्टार बनण्यासाठी कधीच
दीपिका पादुकोण ही नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. दीपिका पादुकोण हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दीपिका पादुकोण हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हिट चित्रपट बाॅलिवूडला दिले आहेत.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे सतत दीपिका पादुकोण हिचे चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहेत. दीपिका पादुकोण हिचा काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला पठाण हा चित्रपट (Movie) हिट ठरलाय. या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण ही मुख्य भूमिकेत दिसली. दीपिका पादुकोण हिच्यासोबत शाहरुख खान देखील या चित्रपटात धमाका करताना दिसला. शाहरुख खान याने याच चित्रपटातून चार वर्षांनंतर पुनरागमन केले.
दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान यांची जोडी असलेला चित्रपट हिट ठरताना नेहमीच दिसतो. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच जवान हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण हिची झलक चाहत्यांना बघायला मिळाली. विशेष म्हणजे शाहरुख खान याचा हा देखील चित्रपट हिट ठरलाय. या चित्रपटाचे प्रमोशन शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना दिसला.
नुकताच आता दीपिका पादुकोण हिने मोठा खुलासा केलाय. दीपिका पादुकोण ही म्हणाली की, ग्लोबल स्टार होण्यासाठी तुम्हाला देश सोडण्याची अजिबातच गरज नाहीये. उलट आपल्याच देशामध्ये एक चांगले वातावरण आपल्याला मिळते, असेही म्हणताना यावेळी दीपिका पादुकोण ही दिसली आहे. यावेळी तिने हाॅलिवूडबद्दलही मोठे भाष्य केले.
दीपिका पादुकोण हिने प्रियांका चोप्रा हिच्यावर निशाणा साधल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. दीपिका पादुकोण हिने ग्लोबल स्टारबद्दल बोलून प्रियांका चोप्रा हिचे नाव न घेता निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. आता यावर प्रियांका चोप्रा ही नेमके काय उत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. दीपिका पादुकोण सध्या तिच्या याच विधानामुळे जोरदार चर्चेत दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोण ही थेट डिप्रेशनबद्दल बोलताना दिसली. दीपिका पादुकोण थेट म्हणाली की, तो एक काळ असा होता की, माझ्या मनात फक्त आणि फक्त आत्महत्या करण्याचा विचार यायचा. मी त्यावेळी फक्त एकच काम करायचे ते म्हणजे झोपण्याचेच. मी फक्त झोपत होते. बाकी मला काहीच गोष्टी कळत नव्हत्या. त्यावेळी माझी आई ही माझ्या मागे खंबीरपणे उभी होती. आजही त्या काळाबद्दल आठवले की, मी घाबरते.