‘माझं कुठलं पात्र तुम्हाला आवडतं?’ दीपिका पादुकोणच्या प्रश्नावर पती रणवीर आणि बहिण अनिशा पादुकोण म्हणाली…

दीपिकाने नुकतंच एक व्हीडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तिने आतापर्यंत साकारलेली पात्र सांगितली आहेत आणि चाहत्यांना यापैकी कोणती भूमिका सर्वाधिक आवडली असं विचारलं आहे. त्यावर तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंगने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'माझं कुठलं पात्र तुम्हाला आवडतं?' दीपिका पादुकोणच्या प्रश्नावर पती रणवीर आणि बहिण अनिशा पादुकोण म्हणाली...
रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, अनिशा पादुकोण
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 4:20 PM

मुंबई : दीपिका पादुकोण (Deepika Padukone) बॉलिवूडच्या टॉप 5 अभिनेत्रींपैकी एक. तिचे सिनेमे सुपरहिट ठरतात. तिने साकारलेली पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. दीपिकाने नुकतंच एक व्हीडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तिने आतापर्यंत साकारलेली पात्र सांगितली आहेत आणि चाहत्यांना यापैकी कोणती भूमिका सर्वाधिक आवडली असं विचारलं आहे. त्यावर अनेकांनी कमेंट करून आपलं उत्तर दिलं आहे. तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंगनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने या सगळ्यातली एक भूमिका निवडणं कठीण असल्याचं म्हटलंय. तर तिची बहिण अनिशाने मला ‘तू’ आवडतेस अशी कमेंट केली आहे.

दीपिकाची इन्स्टाग्राम पोस्ट

दीपिकाने नुकतंच एक व्हीडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तिने आता पर्यंत साकारलेली पात्र सांगितली आहेत . यात ओम शांती ओम मधलं तिचं शांती प्रिया हे पात्र, राम लिलामधलं लीला, ये जवानी है दिवानीमधलं नयना, चेन्नई एक्सप्रेसमधली तिची भूमिका, पीकू, आणि आता तिचा येत असलेला गेहराईयाँ चित्रपटातील अलिशा ही पात्र आहेत. चाहत्यांना यापैकी कोणती भूमिका सर्वाधिक आवडली असं विचारलं आहे. त्यावर अनेकांनी कमेंट करून आपलं उत्तर दिलं आहे.

श्वेता बच्चनला ‘पीकू’ आवडते

दीपिकाच्या या व्हीडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चनने आपलं आवडतं पात्र सांगितलं आहे. तिला पीकू चित्रपटातील ‘पीकू’ हे पात्र आवडल्याचं तिनं सांगितलं आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची देखील महत्वाची भूमिका होती.

‘गेहराईयाँ’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दीपिका वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जाताना दिसतेय. तिने नुकतंच बिग बॉस 15 च्या ग्रॅण्ड फिनालेला हजेरी लावली होती. तसंच ती द कपिल शर्मा शोमध्ये देखील दिसणार आहे.

संबंधित बातम्या

Gehraiyaan Title Track : दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘गेहराईयाँ’चं टायटल साँग रिलीज, दीड तासात दीड मिलियन पार

Celebrity Covid 19 Update : शबाना आजमी कोरोना पॉझिटिव्ह, चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण; लवकर ब-या होण्यासाठी करणार प्रार्थना

कंगना रनौतचा थेट कॅनडाच्या पंतप्रधानांवर निशाणा, म्हणाली, ‘कर्माची फळं भोगावी लागतील’

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.