मुंबई: बॉलीवुडची ‘मस्तानी’ दीपिका पदुकोण (deepika padukone) तिच्या अभिनयाच्या जोरावर बी-टाऊनमध्ये आपलं स्थान टिकवून आहे. तिचा अभिनय तिची भुमिकेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. दीपिका तिच्या सोशल मीडियावरही अॅक्टिव असते. सध्या तिची अशीच एक पोस्ट चर्चेत आहे. त्याचं झालं असं की, दीपिकाने काल तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला. आणि त्यावर निरनिराळया कमेंट आल्या. काहींनी दीपिकाच्या सौंदर्याचं तोंड भरून कौतुक केलं तर काहींनी तिच्या या फोटोवरून ट्रोल केलं.
दीपिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोवर निरनिराळ्या कमेंट येत आहेत. दीपिकाचा पती अभिनेता रणवीर सिंगनेही (ranveer singh) या फोटोवर कमेंट केली आहे. ‘तेरी जुल्फों में खोया रहूँ…’ असं म्हणत रणवीरने दीपिकाच्या फोटोला दाद दिली आहे.
काय आहे दीपिकाची इन्स्टाग्राम पोस्ट
अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. ज्यात तिचे केस विसकटलेले दिसत आहेत. आणि त्यावर तिने लिहिलंय, ‘लोकांना योग्य वाटतं त्या पद्धतीने मी माझ्या केसांना सावरण्याचा प्रयत्न केला पण त्यात मी अपयशी ठरले.’ आता दीपिकाने फोटो पोस्ट केल्यावर कमेंट्सचा पाऊस तर पडणारच. यात तिच्या काही चाहत्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटलंय ‘तु एकदा केसांना साबण लावून पहा… कदाचित काही फरक पडेल.’ तर ‘अगं, एवढी थंडी नाहीये त्यामुळे तू अंघोळ करून घे’, असं दुसऱ्या तिच्या चाहत्यानं म्हटलंय. तर कुणी ‘तुझ्याकडे एवढे पैसे तर नक्की आहेत की तू शॅम्पू खरेदी करू शकतेस, असं म्हणत ट्रोल केलंय.
दीपिकाची कारकीर्द
दीपिका पादुकोणने बॉलीवुडला एक से एक सिनेमे दिलेत. बाजीराव मस्तानी चित्रपटातील मस्तानी ही तिची भूमिका प्रचंड गाजली. पद्मावत चित्रपटातली राणी पद्मावतीची तिची भूमिका विशेष उल्लेखनीय आहे. शिवाय ओम शांती ओम, कॉकटेल, ये जवानी है दिवानी, छपाक या चित्रपटातल्या भूमिका तिने गाजवल्या. नुकतंच 83 चित्रपटातही तिने कपील देव यांच्या पत्नीची भूमिका केली. विविध सामाजिक प्रश्नांवरही दीपिका व्यक्त होत असते. दीपिका तिथे चर्चा हे जणू समिकरणच झालंय. तिच्या पोस्टवर संमिश्र कमेंट्स येत असतात. सध्याच्या तिच्या फोटोवरच्या कमेंट त्याचंच उदाहरण आहे.
संबंधित बातम्या