आई बंगाली, वडील जर्मन… फोटोत दिसणारी चिमुकली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, सावत्र वडिलांचं लावते आडनाव
फोटोमध्ये दिसणाऱ्या चिमुकलीची आई बंगाली, वडील जर्मन..., सावत्र वडिलांचं आडनाव लावत प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये निर्माण केली स्वतःची ओळख... कोण आहे 'ती'?
मुंबई : सोशल मीडियावर कायम सेलिब्रिटींच्या लहानपणीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दिसणारी चिमुकली आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. फोटोमध्ये दिसणाऱ्या चिमुकलीचे आज असंख्य चाहते आहेत. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. एवढंच नाही तर,अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आली. फोटोमध्ये दिसणारी चिमुकली आजची प्रसिद्ध सेलिब्रिटी असून आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे.. चिमुकलीचा फोटो पाहून ती नक्की कोण आहे? हे सांगणं कठीणच आहे..
फोटोमध्ये दिसणारी चिमुकली प्रसिद्ध अभिनेत्री तर आहेच, पण अनेक पुरस्कारांनी तिला सन्मानित देखील करण्यात आलं.. (Bollywood Celebs Childhood Photo) बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी या गोंडस चिमुकलीने मिस एशिया पॅसिफिकचा किताबही जिंकला होता. फोटोमध्ये दिसणाऱ्या चिमुकलीची ओळख पटली नसली तर फोटोमध्ये दिसणाऱ्या चिमुकलीची आई बंगाली आहे, तर वडील जर्मन आहेत..
पण अभिनेत्री तिच्या जर्मन वडिलांचं नाव स्वतःच्या नावापुढे लावत नसून अभिनेत्री तिच्या सावत्र वडिलांच नाव स्वतःच्या नावा पुढे लावते. काही दिवसांपूर्वी फोटोमध्ये दिसणाऱ्या चिमुकलीचं लग्न झालं आहे. पण लग्नाआधी प्रेग्नेंट राहिल्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली.. आपल्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहणारी ही चिमुकली अभिनेत्री दिया मिर्झा आहे..
दिया तिच्या सिनेमांपेक्षा जास्त तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत असते. दिया मिर्झाची आई आणि वडील अभिनेत्रीच्या जन्मानंतर विभक्त झाले. त्यानंतर अभिनेत्रीच्या आईने अहमद मिर्जा यांच्यासोबत लग्न केलं. दीया तिच्या नावा पुढे अहमद मिर्जा हे नाव लावते. दिया हिला नुकताच ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यात स्पॉट करण्यात आलं.
दियाच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने आर माधवनसोबत ‘रेहना है तेरे दिल में’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला आणि विशेषत: या सिनेमातील दियाचे सौंदर्य पाहून अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. पहिल्या सिनेमानंतर दियाने ‘तुमको ना भूल पायेंगे’, ‘दीवानापन’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘दस’ आणि ‘संजू’ सारख्या सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.