Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Life | पती सिगारेटचे द्यायचा चटके, मध्यरात्री घरातून काढायचा बाहेर…! प्रसिद्ध अभिनेत्रीचं वेदनादायक सत्य

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वैवाहिक आयुष्यातील वेदनादायक सत्य..., आलेल्या अपयशामुळे अभिनेत्याची झाली होती अशी अवस्था... पत्नीला मध्यरात्री घराबाहेर काढायचा आणि...!

Love Life | पती सिगारेटचे द्यायचा चटके, मध्यरात्री घरातून काढायचा बाहेर...! प्रसिद्ध अभिनेत्रीचं वेदनादायक सत्य
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 12:21 PM

मुंबई | 21 जुलै 2023 : बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत, ज्यांनी मोठ्या थाटात लग्न केलं, पण त्यांचं लग्न जास्च काळ टिकू शकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि एकटं आयु्ष्य व्यतीत करणं पसंत केलं. आज देखील बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी घटस्फोटासारखा टोकाचा निर्णय घेतात. पण ९० च्या दशकातील सेलिब्रिटींची चर्चा आजही रंगलेली असते. एककाळ बॉलिवूडमध्ये वर्चस्व असलेल्या अभिनेत्याला अपयशाचा सामना करावा लागला. ज्यामुळे अभिनेता पूर्णपणे खचला. मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाल्यानंतर अभिनेता अपयश पचवू शकला नाही. ज्याचा परिणाम अभिनेत्याच्या वैवाहिक आयुष्यावर देखील झाला.

सध्या ज्या सेलिब्रिटीची चर्चा रंगत आहे, ते आता जिवंत नसले, तरी त्यांचे सिनेमे आणि गाणी आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांना प्रोफेशनल आयुष्यात प्रचंड यश मिळालं. पण खासगी आयुष्यात मात्र राजेश खन्ना यांनी अनेक चढ – उतारांचा सामना केला. सध्या सर्वत्र राजेश खन्ना आणि पत्नी डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे.

राजेश खान्ना यांचा वाईट काळ सुरु झाला तो म्हणजे १९७३ मध्ये. एकापाठोपाठ फ्लॉप सिनेमे… चाहत्यांची कमी होत असलेली लोकप्रियता… इत्यादी गोष्टींमुळे राजेश खन्ना पूर्ण पणे खचले होते. आपलं करिअर उद्ध्वस्त होताना पाहून राजेश खन्ना दारू आणि सिगारेटच्या आहारी गेले. पतीला अशा अवस्थेत पाहणं पत्नी डिंपल कपाडिया यांच्यासाठी अत्यंत कठीण होतं.

हे सुद्धा वाचा

डिंपल कपाडिया यांनी पतीला समजावण्याचा प्रयत्न देखील केला. पण त्यांचे प्रयत्न फेल ठरले. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचं नातं पूर्णपणे खचलं होतं. सतत होत असलेल्या भांडणांमुळे डिंपल यांनी दोन मुलींना घेवून घर सोडलं. एका मुलाखतीत डिंपल कपाडिया यांनी वैवाहिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला होता.

डिंपल कपाडिला म्हणाल्या होत्या, ‘राजेश खन्ना वाईट अवस्थेत होते. तेव्हा त्यांनी मला मारहाण देखील केली. त्यांच्या मनात राग इतका होता की, त्यांनी मला सिगारेटचे चटके देखील दिले..’ अशा अनेक चर्चा रंगल्या. पण राजेश खन्ना यांच्या निधनानंतर कुटुंबासह चाहत्यांना मोठा धक्का बसला.

राजेश खन्ना यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, राजेश खन्ना हिंदी सिनेमांचे पहिले सुपरस्टार होते. असंख्य मुली ज्यांच्या प्रेमात वेड्या होत्या, अशा राजेश खन्ना यांच्या मनावर मात्र अभिनेत्री अंजू महेंद्रू यांचं राज्य होतं. एक दोन नाही तर, तब्बल सात वर्ष दोघे लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहिले. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. अखरे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजेश खन्ना यांनी अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यासोबत लग्न केलं.