अभिनेते धर्मेंद्र यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. धर्मेंद्र यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. धर्मेंद्र हे आज कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत. धर्मेंद्र यांनी अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिली आहेत. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लग्नाचा 44 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाला ईशा देओल ही देखील उपस्थित होती. हेमा मालिनी ही धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी आहे. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट न घेताच धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केले.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या दोन मुली असून ईशा देओल आणि अहाना नाव आहे. ईशा देओल हिने बॉयोपिकमध्ये सावत्र आई प्रकाश कौरबद्दल अत्यंत मोठा खुलासा केलाय. कशाप्रकारे प्रकाश कौर यांच्यासोबत ईशा देओलची मुलाखत झाली, हे सांगताना ईशा देओल ही दिसलीये. प्रकाश कौर या सनी देओल आणि बाॅबी देओसच्या आई असून धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी आहेत.
ईशा देओलने म्हटले की, माझे काका अजीत देओल हे खूप जास्त आजारी होते. मी त्यांच्या अत्यंत जवळ असल्याने मला त्यांना भेटायचे होते. अजीत देओल हे माझ्यावर खूप जास्त प्रेम करत. त्यांना भेटायला जाण्यासाठी त्यांच्या घरी गेल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय हा माझ्याकडे शिल्लक नव्हता. मग मी त्यांच्या घरी गेले.
ज्यावेळी अजीत देओल यांच्या घरी ईशा देओल ही पोहचली, त्यावेळी तिथे धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर देखील उपस्थित होत्या. ईशा देओल आणि अहाना यांनी आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या सावत्र आईला बघितले होते. यानंतर प्रकाश कौर यांच्या पाया ईशा देओल आणि अहाना या पडल्या. विशेष म्हणजे प्रकाश कौर यांनी या दोघींना पण आर्शिवाद देखील दिले.
हेच नाही तर त्यानंतर परत कधीच प्रकाश कौर यांना ईशा देओल आणि अहाना यांना भेटल्या नाहीत. ती त्यांची पहिलीच भेट ठरली. सनी देओल आणि बॉबी देओल हे बहीण ईशा देओल हिच्या संपर्कात असल्याचे देखील सांगितले जाते. हेच नाही तर सनी देओलच्या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनसाठी ईशा देओल ही उपस्थित होती. ईशा देओल हिचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झालाय.