‘तू सर्वकाही करशील ना…’, फातिमा सना शेखकडून साऊथ इंडस्ट्रीतील काळी रहस्य उघड, जाणून बसेल धक्का
साऊथ इंडस्ट्रीतील काळी रहस्य उघड, महिलांना करावा लागतो वाईट परिस्थितींचा सामना, 'दंगल गर्ल' फातिमा सना शेखकडून मोठं सत्य उघड... फातिमा कायम तिच्या प्रोफेशनल आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते.

झगमगत्या विश्वाचं आकर्षण अनेकांना असतं. पण झगमगत्या विश्वातील ग्लॅमर मागे सेलिब्रिटींना अनेक वाईट प्रसंगांचा सामना करावा लागतो. सिनेविश्वात स्वतःची ओळख निर्माण करत असताना फक्त अभिनेत्रींनाच नाही तर, अभिनेत्यांना देखील अडचणींतून जावं लागतं. आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत ‘दंगल’ फेम अभिनेत्री फातिमा सना शेख हिने साऊथ इंडस्ट्रीतील काळी रहस्य उघड केलं आहे. साऊथ इंडस्ट्री होणाऱ्या कास्टिंग काऊचबद्दल अभिनेओत्रीने मोठा खुलासा केला आहे.
करियरच्या सुरुवातीला अनेक वाईट परिस्थितींचा सामना करावा लागला… असं फातिमा म्हणाली. साऊथ सिनेमातील एका कास्टिंग एजंटसोबत झालेल्या तिच्या संभाषणाबद्दल सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, ‘त्याने मला विचारलं, तू सर्वकाही करण्यासाठी तयार आहेस ना?’
कास्टिंग एजंटच्या प्रश्नाचं उत्तर देत फातिमा म्हणाली, ‘मी प्रचंड मेहनत करेल आणि सिनेमातील भूमिकेसाठी जे काही गरजेचं असेल ते सर्वकाही करण्यासाठी मी तयार आहे. त्याला काय म्हणायचं आहे मला कळत होतं. पण मी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. मला देखील पाहायचं होतं तो किती खालच्या पातळीला जातोय…’
‘निर्माते यावर बिनधास्त बोलतात. म्हणतात, ‘तुला माहिती आहे याठिकाणी लोकांना भेटावं लागतं. कोणत्याच पद्धतीने तो सरळ बोलत नाही हे मला कळलं होतं. ते कधीच स्पष्ट शब्दात बोलणार नाही. पण त्यांचा हेतू आपल्याला कळलेला असतो. ते म्हणतात, तुला लोकांना भेटावं लागेल, सर्वकाही करावं लागेल…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
या आव्हानांना न जुमानता फातिमाने कबूल केले की इंडस्ट्रीतील प्रत्येकजण अशा वृत्तीचा नसतो. ‘इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मी अनेक वाईट गोष्टी ऐकल्या आहे. ज्या मव हेलावून टाकतात. सेलिब्रिटींना वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो…’ आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना त्यांना आलेले अनुभव सांगितले आहेत.
फातिमा सना शेख हिने आगामी सिनेमे
फातिमा सना शेख लवकरच अनुराग बसूच्या रोमँटिक ड्रामा ‘मेट्रो…इन डिनो’ मध्ये आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अनुपम खेर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा आणि अली फजल यांच्यासोबत दिसणार आहे.