श्रीमंत उद्योजक, प्रसिद्ध सिलेब्रिटी अनेकांसोबत अभिनेत्रीचे ‘प्रेमसंबंध’, पण आजही खऱ्या प्रेमाच्या प्रतीक्षेत

Love Life | एक-दोन नाही तर तब्बल ८ सेलिब्रिटींसोबत अभिनेत्रीचं 'प्रेमसंबंध', तिच्यामुळे एका अभिनेत्याचं झालं घटस्फोट! पण आजही 'ती' खऱ्या प्रेमाच्या प्रतीक्षेत... बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीचं अभिनेत्रीचं खासगी आयुष्य चव्हाट्यावर... कोण आहे ती?

श्रीमंत उद्योजक, प्रसिद्ध सिलेब्रिटी अनेकांसोबत अभिनेत्रीचे 'प्रेमसंबंध', पण आजही खऱ्या प्रेमाच्या प्रतीक्षेत
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 1:26 PM

मुंबई | 14 ऑक्टोबर 2023 : बॉलीवूडमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या कामामुळे कमी तर प्रेमप्रकरणांमुळेच जास्त चर्चेत असतात. बॉलीवूडमध्ये काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं, तरी देखील त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. आजही बॉलीवूडमधील काही अभिनेत्री खऱ्या प्रेमाच्या प्रतीक्षेत आहेत. आता सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे तिने श्रीमंत उद्योजक,  प्रसिद्ध सेलिब्रिटी यांना देखील डेट केलं. एवढंच नाही तर एका अभिनेत्यासोबत असलेल्या नात्यांमुळे त्याच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी आल्या. अभिनेत्याच्या घटस्फोटाच्या देखील चर्चा रंगल्या. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्याची चर्चा रंगत आहे, त्या अभिनेत्रीचं नाव हुमा कुरेशी असा आहे.

हुमा कुरेशी हिने दिग्दर्शक अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘गँग्स ऑफ वासेपूर’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमामुळे अभिनेत्रीला नवी ओळख मिळाली. पण हुमा कुरेशी तिच्या प्रोफेशनल आयुष्यमुळे नाही तर खाजगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत राहिली आणि आजही हुमा कुरेशी तिच्या खाजगी आयुष्यामुळेच चर्चेत असते.

बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच हुमा कुरेशी हिचं नाव मनोज तन्वर या पुरुषासोबत जोडण्यात आलं होतं. 2007 मध्ये त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा तुफान रंगली होती. पण दोघांचं नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्लीतील श्रीमंत उद्योजक इम्राहीम अन्सारी यांच्यासोबत हुमा कुरेशीचं नाव जोडण्यात आलं. 2008 पर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केलं. पण त्यांचा नातं देखील जास्त काळ टिकू शकलं नाही.

हे सुद्धा वाचा

बॉलीवूडमध्ये आपल्या दिलखेच अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या हुमा कुरेशी हिचं नाव अर्जुन बजवा याच्यासोबत देखील जोडण्यात आलं. 2012 मध्ये दोघांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र तुफान रंगल्या होत्या. एवढेच नाही तर हुमा कुरेशी हिचं नाव अभिनेता शाहिद कपूर याच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण दोघांचं नातं जास्त काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी त्यांचे मार्ग वेगळे केले

हुमा कुरेशी हीच नाव ‘गँग्स ऑफ वासेपूर’ सिनेमाचा दिग्दर्शकअनुराग कश्यप याच्या सोबत देखील जोडण्यात आलं. दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांनी कधीही त्यांचं नातं सार्वजनिकरित्या कबूल केलं नाही. पण आजही त्यांच्या नात्यची चर्चा रंगलेली असते.

महत्त्वाचं म्हणजे 2016 मध्ये हुमा कुरेशी आणि अभिनेता सलमान खान याचा भाऊ सोहेल खान यांच्या नात्याची देखील तुफान चर्चा रंगली. पण रंगणाऱ्या चर्चा फक्त आणि फक्त अफवा असल्याचं वक्तव्य सोहेल आणि हुमा यांनी केलं. दरम्यान सोहेल याचं घटस्फोट झाल्यामुळे हुमा हिला जबाबदार ठरवण्यात आलं होतं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.