‘मुसलमान व्यक्तींसोबत होतोय भेदभाव?’, प्रसिद्ध अभिनेत्रीने यावर केलेलं वक्तव्य थक्क करणारं

'सरकारने उत्तरं दिलीच पाहिजे...', भारतातील मुसलमानांच्या अधिकाराबद्दल अभिनेत्रीचं थक्क करणारं वक्तव्य.... सध्य सर्वत्र बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची चर्चा..

'मुसलमान व्यक्तींसोबत होतोय भेदभाव?', प्रसिद्ध अभिनेत्रीने यावर केलेलं वक्तव्य थक्क करणारं
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 1:50 PM

मुंबई | आजपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करताना आलेल्या अडचणींबद्दल सांगितलं. आता अभिनेत्री हुमा कुरेशी हिने देखील बॉलिवूडबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या हुमा तिचा आगामी प्रोजेक्ट ‘तरला’मुळे तुफान चर्चेत आहे. ‘झी ५’वर प्रदर्शित होणारा ‘तरला’ सिनेमा रेसिरी लेखिका ‘तरला दलाल’ यांच्या आयु्ष्यावर आधारित आहे. सध्या अभिनेत्री सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने बॉलिवूड आणि मुस्लीम व्यक्तींसोबत होणाऱ्या भेदभावाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र हुमा कुरेशी आणि तिने केलेल्या वक्तव्याची तुफान चर्चा रंगत आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीला मुस्लीम व्यक्तींसोबत होणाऱ्या भेदभावाबद्दल विचारण्यात आलं. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘आताच्या घडीला यासर्व गोष्टी ऐकते, तेव्हा असं वाटतं की, खरंच असं काही आजही सुरु आहे…’ पुढे अभिनेत्रीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेतील माध्यमांनी भारतातील मुसलमानांच्या अधिकाराबद्दल विचारलं होतं. यावर देखील हुमाला विचारण्यात आलं..

भारतातील मुसलमानांच्या अधिकाराबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘भारतात राहत असताना मला कधी कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागला नाही. माझे वडील गेल्या ५० वर्षांपासून ‘सलीम’ नावाच्या हॉटेलचे मालक आहेत. पण लोकांना काही गोष्टी खटकत असतील.. ‘ असं देखील अभिनेत्री म्हणाली…

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्रीने केलेल्या वक्तव्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. ‘असे प्रश्न विचारण्यात आले पाहिजे आणि सरकारने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे..’ सध्या सर्वत्र हुमा कुरेशी हिची चर्चा रंगत आहे. हुमा कुरेशी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत असते.

सध्या हुमा आगामी ‘तरला’ सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. आगामी सिनेमात हुमा कुरेशी सेलिब्रिटी शेफ आणि रेसिपी लेखक तरला दलाल यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सेलिब्रिटी शेफ तरला दलाल यांना २००७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. २०१३ मध्ये वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सेलिब्रिटी शेफ तरला दलाल यांनी स्वयंपाकावर शंभरहून अधिक पुस्तके लिहिली आहेत, त्यांचं प्रत्येक पुस्तके महिलांना खूप आवडतात. तरला दलाल यांनी ‘तरला दलाल शो’ आणि ‘कुक इट अप विथ तरला दलाल’ सारखे लोकप्रिय कुकिंग शो होस्ट केले होते. आता त्यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येत असून पियूष गुप्ता यांनी सिनेमातं दिग्दर्शन केले आहे.

दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.