कैद्याकडून येणाऱ्या गिफ्टबद्दल जॅकलीन फर्नांडिसचं स्पष्टीकरण, ‘महागडे गिफ्ट मिळत असल्यामुळे…’
Jacqueline Fernandez: तुरुंगातील कैद्याकडून येणाऱ्या गिफ्टबद्दल जॅकलीन फर्नांडिसचं स्पष्टीकरण, पूर्वी खासगी फोटो व्हायरल झाल्यामुळे आली होती चर्चेत, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जॅकलीन हिच्या वक्तव्याची चर्चा...
Jacqueline Fernandez: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिच्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या खटल्यात जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलाचा युक्तिवाद समोर आला. अशा परिस्थितीत अभिनेत्रीच्या वकिलांनी जे काही सांगतलं त्यावर चाहत्यांनाही विश्वास बसत नाही. जॅकलीन आणि सुकेश यांच्यामध्ये प्रचंड प्रेम होतं. तो अभिनेत्रीला सतत महागड्या भेटवस्तू देखील द्यायचा. दोघांचे खासगी फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
रिपोर्टनुसार, सुकेशकडून येणाऱ्या भेटवस्तू मनी लॉन्ड्रिंगचा एक भाग असल्याची कल्पना जॅकलीन हिला नव्हती… असा दावा अभिनेत्रीच्या वकिलांनी केला आहे. जॅकलीन हिला मिळणाऱ्या भेटवस्तूंचा मुख्य स्त्रोत माहिती नव्हता. या सर्व भेटवस्तू बेकायदेशीर असल्याचं जॅकलीनला माहीत नव्हते. मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्रीविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राला तिने आव्हान दिले आहे.
View this post on Instagram
रिपोर्टनुसार, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलीन गुन्हागार नाही. सुकेश चंद्रशेखरकडून मिळालेल्या भेटवस्तू, गुन्ह्यातील रक्कम आणि त्याच्या गुन्हेगारी कारवायांचा भाग असल्याचे अभिनेत्रीला माहीत नव्हतं, असे आरोपपत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, सुनावणी दरम्यान, न्यायमुर्ती अनीश दयाल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ‘मिळणाऱ्या महागड्या वस्तू कुठून आणि कशा प्रकारे येत आहेत… हे जाणून घेणं कर्तव्य आहे…’ आता याप्रकरणी पुढील सुनावणी 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, , जॅकलीन फर्नांडिस हिच्यावर खंडणी रॅकेटच्या कमाईचा वापर करून खरेदी केलेल्या भेटवस्तूंचा वापर केल्याचाही आरोप आहे. मात्र, अभिनेत्रीने या घोटाळ्यात आपला सहभाग नसल्याचं सांगितलं आहे.
आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या खटल्यात जॅकलीन हिच्याशिवाय अन्य प्रसिद्ध अभिनेत्री देखील कायद्याच्या कचाट्यात आहे. याप्रकरणी अभिनेत्री नोरा फतेही आणि बिग बॉस स्टार निक्की तांबोळी यांची देखील चौकशी करण्यात आली आहे.