ढसाढसा रडू लागली… पॅनिक अटॅकही आला, जान्हवी कपूरच्या आयुष्यात असं काय घडलं?; ती घटना…
बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. विशेष म्हणजे जान्हवी कपूर हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. जान्हवी कपूरचे चित्रपट तूफान कामगिरी करताना देखील दिसत आहेत. जान्हवी कपूर हिने आता नुकताच अत्यंत मोठा खुलासा केलाय.
बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर ही चांगलीच चर्चेत आहे. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे एका मागून एक चित्रपट जान्हवी कपूर हिचे प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. जान्हवी कपूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. जान्हवी कपूर ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. जान्हवी कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे. नुकताच जान्हवी कपूरने हैराण करणारा खुलासा केलाय.
जान्हवी कपूर हिने एक अशी घटना सांगितले की, यापूर्वी याबद्दल कोणालाच माहिती नव्हते. जान्हवी कपूरचे बोलणे ऐकून चाहते हैराण झाल्याचे देखील बघायला मिळतंय. जान्हवीचा पहिला चित्रपट ‘धडक’ रिलीज होण्याच्या 5 महिन्याच्या अगोदरच श्रीदेवी यांचे निधन झाले. आईच्या निधनाचे दु:ख बाजूला ठेऊन चित्रपटाचे प्रमोशन करताना जान्हवी कपूर दिसली.
जान्हवी कपूर म्हणाली की, धडक चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी मी एका डान्स रिॲलिटी शोमध्ये गेले. यावेळी आईचे निधन होऊन काहीच दिवस झाले होते. त्यादरम्यान असा एकही दिवस नव्हता, ज्यावेळी मला आईची आठवण नाही आली. यामुळेच प्रमोशन इव्हेंटमध्ये आईची आठवण करून देऊ नये, याची संपूर्ण काळजी ही टीमकडून घेतली जात होती.
डान्स रिॲलिटी शोमध्ये आई श्रीदेवी हिला श्रद्धांजली वाहणार असल्याचे सांगितले नव्हते. अचानक तिथे भावूक आवाजात श्रीदेवीची प्रसिद्ध गाणी पडद्यावर दाखवली आणि शोमध्ये सहभागी झालेल्या मुलांनी डान्स करत तिला आदरांजली वाहण्यास सुरूवात केली. जे काही घडत होते ते छान होते, परंतू मी त्यासाठी अजिबात तयार नव्हते. मला काहीच सूचत नव्हते आणि श्वास घेणेही कठीण झाले.
मी ओरडत होते आणि रडत होते. मी तिथून पळत व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेले. तिथे मला पॅनिक अटॅक आला. डान्स रिॲलिटीने ते काहीच दाखवले नाही. त्यांनी माझ्या भावनांचा आदर केला. त्या जागी त्यांनी माझी प्रतिक्रिया म्हणून त्या एपिसोडमध्ये माझा एक हासणारा व्हिडीओ दाखवला. त्यानंतर लोकांनी मला खूप जास्त ट्रोल केले. याबद्दल पहिल्यांदाच बोलताना जान्हवी कपूर ही दिसली.