Janhvi Kapoor | बाॅलिवूडला कायमचा रामराम करण्याच्या तयारीत बोनी कपूर यांची लेक, जान्हवी कपूरचा मोठा खुलासा
बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत असते. जान्हवी कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. जान्हवी कपूर ही आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.
मुंबई : बोनी कपूर यांची लेक आणि बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांपेक्षाही अधिक पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शिखर पहाडिया (Shikhar Paharia) याच्यासोबत जान्हवी कपूर तिरूपती बालाजी मंदिरात पोहचली. यावेळी अत्यंत खास लूकमध्ये जान्हवी कपूर दिसली. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे दोघे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करताना दिसतायंत.
जान्हवी कपूर हिने अजून त्यांच्या रिलेशनवर खुलासा केला नाही. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचे सोशल मीडियावर कायमच फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतायंत. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, जान्हवी कपूर हिने शिखर पहाडिया याच्यासोबत गुपचूप पद्धतीने साखरपुडा केला.
जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच मिली हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, जान्हवी कपूर हिच्या या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात अजिबात यश मिळाले नाही. मिली या चित्रपटाची निर्मिती तिचेच वडील बोनी कपूर यांनी केली. मिली चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने चित्रपट फ्लाॅप गेला. हा जान्हवी कपूर हिच्यासाठी मोठा धक्का होता.
आता नुकताच जान्हवी कपूर हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमुळे जान्हवी कपूर ही सध्या चर्चेत आहे. इतके नाही तर थेट जान्हवी कपूर हिने अभिनय सोडण्याबद्दल देखील भाष्य केले. जान्हवी कपूर हिची लहान बहीण खुशी कपूर ही द आर्चीज या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये धमाका करण्यास तयार आहे.
जान्हवी कपूर म्हणाली की, मी खुशी कपूर हिच्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी सेटवर जाऊ शकले नाही. यामुळे मी खूप जास्त दु:खी झाले. जर या ठिकाणी मी माझ्या कुटुंबियांसोबत सहभागी होऊ शकत नाही तर मग फायदा काय? मला पहिल्यांदा वाटले की, मी अभिनय क्षेत्र सोडायला हवे. जान्हवी कपूर हिचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.