जान्हवी कपूर हिने केला 14 वर्षांनी मोठा अभिनेत्यासोबत रोमांन्स, लोकांनी सुनावले खडेबोल, ‘ते’ गाणे…
जान्हवी कपूर हिचे काही फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसले. यामध्ये ती अनंत अंबानीच्या लग्नात धमाल करताना दिसली. अनंत अंबानीच्या लग्नानंतर लगेचच जान्हवी कपूर हिने आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनला सुरूवात केली. मात्र, जान्हवी कपूरच्या उलझ चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही.
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हे तूफान चर्चेत असलेले एक नाव आहे. जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, म्हणावा तसा धमाका करण्यात जान्हवी कपूरच्या चित्रपटांना यश मिळाले नाहीये. जान्हवी कपूर सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना जान्हवी कपूर दिसते. जान्हवी कपूर ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आगामी चित्रपटांचे प्रमोशन करतानाही दिसते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात धमाल करताना जान्हवी कपूर ही दिसली होती. गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे.
जान्हवी कपूर ही ‘देवरा पार्ट 1’ चित्रपटामध्ये ज्यूनिअर एनटीआर याच्यासोबत धमाल करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे गाणे हळूहळू रिलीज होताना दिसत आहेत. नुकताच रिलीज झालेल्या गाण्यामध्ये जान्हवी कपूर ही ज्यूनिअर एनटीआर याच्यासोबत रोमांन्स करताना दिसत आहे. हेच लोकांना अजिबातच आवडले नसल्याचे बघायला मिळतंय.
जान्हवी कपूर ही ज्यूनिअर एनटीआर याच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान आहे. यामुळे ज्यूनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूरचा रोमांन्स लोकांना अजिबातच आवडला नाहीये. एकाने कमेंट करत म्हटले की, जान्हवी कपूर ही ज्यूनिअर एनटीआर याच्यासाठी त्याच्या मुलीच्या वयाची आहे आणि असा रोमांन्स? काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिने सांगितले होते की, तिला ज्यूनिअर एनटीआर याच्यासोबत डान्स करायचा आहे.
ज्यूनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांची जोडी देवरा पार्ट 1 मध्ये काय धमाका करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, निर्मात्यांना देवरा पार्ट 1 या चित्रपटाकडून खूप जास्त अपेक्षा या नक्कीच आहेत. ज्यूनिअर एनटीआरसोबत काम करण्याचे आपले स्वप्न असल्याचे काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये जान्हवी कपूर हिने म्हटले होते. शेवटी जान्हवी कपूर हिचे हे स्वप्न पूर्ण झाल्याचे देखील बघायला मिळाले.
जान्हवी कपूर ही फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आलीये. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत असून लवकरच हे लग्न करणार असल्याचेही सांगितले जातंय. अनंत अंबानीच्या लग्नात शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर हे धमाका करताना दिसले. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी सर्वांच्या गुपचूप साखरपुडा केलाय.