जान्हवी कपूर हिच्यावर केला महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाने प्रेमाचा वर्षाव, अभिनेत्रीने..
Janhvi Kapoor Post : बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत असते. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. जान्हवी कपूर तिच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतंय.
बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत असते. जान्हवी कपूर हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिचा बवाल हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, बवाल चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. आता जान्हवी कपूर ही तिच्या आगामी चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आलीये. जान्हवी कपूर चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसत आहे. जान्हवी कपूर ही सोशल मीडियावरही सक्रिय आहे. चित्रपटाचे प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना जान्हवी कपूर दिसत आहे.
जान्हवी कपूर ‘मिस्टर अॅन्ड मिसेस माही’ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतंय. आता नुकताच जान्हवी कपूर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये जान्हवी कपूरने मिस्टर अॅन्ड मिसेस माही चित्रपटातील तिच्या लूकचा फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जान्हवी कपूर हिचा जबरदस्त असा लूक दिसत आहे. चाहत्यांना तिचा हा लूक आवडलाय.
जान्हवी कपूर हिने शेअर केलेल्या या पोस्टवर शिखर पहाडिया याने कमेंट केलीये. प्रेमाचा वर्षाव करताना शिखर पहाडिया हा दिसतोय. जान्हवी कपूर हिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. फक्त शिखर पहाडिया हाच नाही तर जान्हवी कपूर हिच्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, यांनी त्यांच्या रिलेशनवर अजूनही काही भाष्य केले नाहीये. काही दिवसांपूर्वीच शिखर पहाडिया हा बोनी कपूर यांच्यासोबत विमानतळावर स्पाॅट झाला. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे लवकरच लग्न करणार असल्याची देखील सतत चर्चा रंगताना दिसत आहे.
मध्यंतरी एक चर्चा होती की, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी सर्वांच्या गुपचूप साखरपुडा केला. शिखर पहाडिया हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. शिखर पहाडिया हा अनेक कंपन्यांचा मालक देखील आहे. शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर यांचे शिक्षण देखील एकसोबत झाले. शिखर पहाडिया याचा भाऊ वीर पहाडिया याला सारा अली खान डेट करत असल्याची चर्चा आहे.