जान्हवी कपूर हिने घातले चक्क सोने आणि हिऱ्यांचे ब्लाऊज, बोनी कपूर म्हणाले, हिरे आणि सोने…
जान्हवी कपूर हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे जान्हवी कपूर आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही दिसते. आता नुकताच काही खास फोटो तिने शेअर केले आहेत.
अभिनेत्री जान्हवी कपूर हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात धमाल करताना जान्हवी कपूर ही दिसली. जान्हवी कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया यांच्या डान्सचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसला.जान्हवी कपूर ही अनंत अंबानीच्या प्रत्येक सेरेमनीमध्ये खास लूकमध्ये पोहोचली. जान्हवी कपूर ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाचे देखील जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. जान्हवी कपूर हिचा उलझ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
आता जान्हवी कपूर हिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. जान्हवी कपूर हिने अनंत अंबानीच्या लग्नात गोल्डन लेहेंगा घातला. या लेहेंग्याचे ब्लाऊज हे सोन्याच्या टेम्पल ज्वेलरीपासून तयार करण्यात आले होते. या लेहेंग्याची जोरदार चर्चा देखील रंगताना दिसली. चक्क सोन्यानंतर जान्हवी कपूरने हिऱ्यांपासून तयार केलेले ब्लाऊज घातले.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या रिसेप्शनमध्ये जान्हवी कपूर ही आयवरी आउटफिटमध्ये पोहोचली. ज्यामध्ये तिने मर्मेड स्कर्ट आणि हिऱ्यांपासून तयार करण्यात आलेले ब्लाऊज घातले होते. या आउटफिटमध्ये जबरदस्त अशा लूकमध्ये जान्हवी कपूर ही दिसत होती. याचेच फोटो जान्हवी कपूर हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
हे फोटो शेअर करत जान्हवी कपूरने अत्यंत खास असे कॅप्शनही शेअर केले. जान्हवी कपूरने लिहिले की, एक दिवस सोने एक दिवस हिरे…विशेष म्हणजे लेकीच्या या पोस्टवर कमेंट करत बोनी कपूर यांनी लिहिले की, हिरा, सोना, चांदी तुझ्यासमोर फिके आहेत बेटा…यासोबत अर्जुन कपूर यानेही बहीण जान्हवी कपूर हिच्या या पोस्टवर कमेंट केलीये.
मुळात म्हणजे चाहत्यांना जान्हवी कपूर हिचा हा लूक जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळतंय. जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना जान्हवी कपूर दिसते. जान्हवी कपूर ही लवकरच शिखर पहाडिया याच्यासोबत लग्न करणार असल्याचे देखील काही दिवसांपासून सांगितले जातंय.