Janhvi Kapoor | चक्क ब्लाऊज न घालता साडीमध्ये दिसली जान्हवी कपूर, अभिनेत्रीचा नवा लूक पाहून लोक हैराण
बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच मिली हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, जान्हवी कपूर हिच्या या चित्रपटाचे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नातवाला जान्हवी कपूर ही डेट करत आहे. विशेष म्हणजे शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ (Video) हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतात. इतकेच नाही तर जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी गुपचूप प्रकारे साखरपुडा केल्याचे सांगितले जात आहे.
जान्हवी कपूर किंवा शिखर पहाडिया यांनी अजूनही त्यांच्या रिलेशनवर भाष्य केले नाहीये. मात्र, हे लवकरच लग्नबंधनात अडकतील असेही सांगितले जात आहे. जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसते. जान्हवी कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.
आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना जान्हवी कपूर कायमच दिसते. जान्हवी कपूर हिने नुकताच एक अत्यंत खास असे फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये जान्हवी कपूर हिचा लूक जबरदस्त असा दिसतोय. विशेष म्हणजे तिच्या लूकमुळे नाही तर इतर एका वेगळ्या कारणामुळे तिचे हे फोटो चर्चेत आले आहेत.
जान्हवी कपूर हिने हे फोटोशूट काॅटनच्या साडीवर केले आहे. मात्र, या फोटोमध्येमध्ये जान्हवी कपूर हिने ब्लाऊज घातलेले दिसत नाहीये. जान्हवी कपूर हिने अत्यंत खास प्रकारे ही साडी घातली आहे. जान्हवी कपूर हिच्या चाहत्यांना तिचा हा लूक जबरदस्त आवडल्याचे दिसत आहे. चाहते या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. मात्र, नेटकरी जान्हवीचा हा लूक पाहूर हैराण झाले आहेत.
View this post on Instagram
जान्हवी कपूर ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यक्त आहे. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी कपूर ही दिसली. मात्र, जान्हवी कपूर हिचा मिली चित्रपट फ्लाॅप गेला. मिली या चित्रपटाची निर्मिती तिचेच वडील बोनी कपूर यांनी केली.
काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याच्यासोबत तिरुपती मंदिरात गेली. याचे काही व्हिडीओ आणि फोटो तूफान व्हायरल होताना दिसले. यावेळी जान्हवी कपूर हिच्या हातामध्ये खास रिंग दिसली. ही रिंग पाहूनच अनेकांनी म्हटले की, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी गुपचूप पद्धतीने साखरपुडा केला.