जान्हवी कपूर हिच्या अंगावर फेकले मोबाईल, धक्कादायक प्रकार, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, अखेर..
बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. विशेष म्हणजे जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. जान्हवी कपूर चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसतंय. सध्या सोशल मीडियावर जान्हवी कपूरचा एका व्हिडीओ व्हायरल होतोय.
जान्हवी कपूर ही सध्या तूफान चर्चेत आहे. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. सध्या जान्हवी कपूर ही तिच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. जान्हवी कपूर हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. लवकरच जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याच्यासोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे. हेच नाही तर जान्हवी कपूर तिच्या आणि शिखर पहाडियाच्या नात्याबद्दल बोलताना देखील दिसली.
जान्हवी कपूर हिचा सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स याच्या सामन्यामधील आहे. यावेळी जान्हवी कपूर ही ओरी याच्यासोबत स्टेडियममध्ये पोहचली. जान्हवी कपूर हिला स्टेडियममध्ये बघितल्यावर चाहत्यांनी एकच गोंधळ सुरू केला. यावेळी अनेकांनी जान्हवी कपूरचे फोटोही घेतले.
यानंतर काही उत्साही चाहत्यांनी थेट जान्हवी कपूर हिच्याकडे आपले मोबाईल फेकले. एक एक करून जवळपास पाच ते सात मोबाईल जान्हवी कपूर हिच्याकडे लोकांनी फेकले. जान्हवी कपूर चाहत्यांनी फेकलेले मोबाईल पकडताना देखील दिसली. एक मोबाईल जान्हवी कपूर हिला लागल्याचे देखील व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. यावेळी जान्हवी कपूर हासताना दिसलीये.
View this post on Instagram
जान्हवी कपूर हिच्यासोबत स्टेडियममध्ये ओरी देखील पोहचला होता. मात्र, ज्याप्रमाणे जान्हवी कपूर हिच्याकडे मोबाईल फेकले जात आहेत, ते पाहून लोक हैराण झालेत. यावेळी ओरी आणि जान्हवी कपूर धमाल करताना दिसले. जान्हवी कपूर आणि ओरी खूप चांगले मित्र आहेत. काही दिवसांपूर्वीच ओरी हा शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर यांच्यासोबत थेट तिरूपती बालाजी मंदिरात देखील दिसला. यावेळीचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.
जान्हवी कपूर हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिचा बवाल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या देखील चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी कपूर ही दिसली. जान्हवी कपूर कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील बघायला मिळते.