श्वेता हिच्यासोबत भर शोमध्येच जया बच्चन यांची ‘तू तू मैं मैं’, अभिनेत्रीचा संताप, लोक हैराण
Jaya Bachchan and Shweta Bachchan : बच्चन कुटुंबिय हे कायमच चर्चेत असते. बच्चन कुटुंबाच्या प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांच्या बारीक नजरा या बघायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा ही बघायला मिळतंय. मात्र, यावर अजूनही बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही काहीही भाष्य हे केले नाहीये.
मुंबई : जया बच्चन या त्यांच्या विधानांमुळे कायमच चर्चेत असतात. जया बच्चन यांनी एक मोठा काळ नक्कीच गाजवला आहे. जया बच्चन यांनी हिट चित्रपटे दिली आहेत. सध्या चित्रपटांसह राजकारणात देखील जया बच्चन या चांगल्याच सक्रिय दिसतात. जया बच्चन या त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. जया बच्चन यांचे अनेकदा सोशल मीडियावर काही व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. या व्हिडीओंमध्ये जया बच्चन या चक्क पापाराझी यांच्यावर भडकताना देखील दिसतात. जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय हिच्याबद्दल मोठे विधान करत थेट तिच्या चुकाच सांगितल्या.
आता नुकताच नव्या नवेली नंदा हिच्या शोमध्ये जया बच्चन, श्वेता बच्चन आणि अगस्त्य नंदा हे पोहचले होते. मात्र, थेट भर शोमध्येच लेक श्वेता बच्चन आणि जया बच्चन यांच्यामध्ये वाद हा बघायला मिळाला. या प्रकारानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. जया बच्चन यांना राग अनावर झाल्याचे स्पष्टपणे दिसतंय. त्यांनी लेकीला खडेबोल सुनावले.
त्याचे झाले असे की, नव्याने अगस्त्य याला विचारले की, पुरूष हे मेंटल हेल्थबद्दल जास्त बोलतात? यावर जया बच्चन या म्हणाल्या की, हे खूप जास्त पर्सनल आहे आणि यामध्ये नक्कीच काहीच वाईट नाहीये. यावर अगस्त्य म्हणतो की, प्रत्येक गोष्ट मनामध्ये ठेवण्याचे देखील एक लेव्हल असते. काही लोकांना वाटते की, मी समोरच्या लोकांना परिशान करू नये आणि काहींना वाटते की, समोरचा व्यक्ती काय विचार करेल.
यावर श्वेता म्हणते की, आज पुरूष यावर जास्त बोलू लागले आहेत. यावर जया बच्चन थेट म्हणतात की, श्वेता मला वाटते की, आज यावर सर्वचजण जास्त बोलत आहेत. लोक डिप्रेशनबद्दल बोलत आहेत. मी तर जास्त करून लोकांना हे बोलताना ऐकते की, मी मेंटली एग्जाॅस्टेड आहे. जया बच्चन यांचे हे बोलणे सुरू असतानाच मध्येच श्वेता म्हणते की, लोक नाही तर मी हे तुलाच (जया बच्चन) अनेकदा हे बोलताना ऐकले आहे.
याचा अर्थ मला एकटे सोडा. हे ऐकून नव्या म्हणते की, आज खूप हिंमत आलीये, हे तू बोलली. यानंतर जया बच्चन या तोंड वाकडे करताना दिसत आहेत. जया बच्चन पुढे म्हणतात की, ठिक आहे मला शांत करा आता. श्वेता म्हणते की, मी तुला चूप करत नाहीये मी कोण आहे तुला चूप करणारी. तु बोलले पाहिजे. मात्र, यानंतर थेट बोलण्यास जया बच्चन या नकार देतात. थेट शोमध्ये जया बच्चन आणि श्वेता यांच्यामध्ये तू तू मैं मैं बघायला मिळाली.