जया बच्चन यांचा थेट खुलासा, म्हणाल्या, अमिताभ यांनी ऐश्वर्या हिला कधीच मानले नाही सून, अखेर घटस्फोटाच्या चर्चांमध्येच…

Aishwarya Rai and Abhishek Bachchan divorce : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन ही चाहत्यांची आवडती जोडी नक्कीच आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर यांचा घटस्फोट होणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.

जया बच्चन यांचा थेट खुलासा, म्हणाल्या, अमिताभ यांनी ऐश्वर्या हिला कधीच मानले नाही सून, अखेर घटस्फोटाच्या चर्चांमध्येच...
Aishwarya Rai
Follow us
| Updated on: Aug 03, 2024 | 1:05 PM

गेल्या काही दिवसांपासून एका घटस्फोटाची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. हा घटस्फोट दुसऱ्या तिसऱ्या कोणालाच नसून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे लवकरच घटस्फोट घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे. फक्त हेच नाही तर काही रिपोर्टमध्ये थेट ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट झाल्याचेही म्हटले आहे. मात्र, सततच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी भाष्य करणे टाळले आहे. खरोखरच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार का? हा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय. 2007 मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी लग्न केले. विशेष म्हणजे यांचा विवाहसोहळा अत्यंत खास राहिला.

अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर ऐश्वर्या राय ही सलमान खान याला डेट करत होती. हेच नाही तर ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचे लग्न होणार असल्याचीही चर्चा होती. मात्र, यांचे अचानक ब्रेकअप झाले. सलमान खान याच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची जवळीकता वाढली आणि त्यांनी डेट करण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर लग्न केले.

ऐश्वर्या राय हिच्याबद्दल एका शोमध्ये मोठे भाष्य करताना जया बच्चन या दिसल्या. जया बच्चन या म्हणाल्या की, कधीच अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या रायला सून मानले नाही. श्वेता बच्चन हिच्या लग्नानंतर मुलीची कमी सतत जाणवत होती. अभिषेकच्या लग्नानंतर ती नक्कीच पूर्ण झाली. अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला सून नाही तर मुली मानले.

जया बच्चन यांनी ऐश्वर्या राय हिच्याबद्दल केलेले हे विधान तसे जुने आहे. मात्र, सध्या घटस्फोटाची चर्चा सुरू असताना हे परत चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाला श्वेता बच्चन कारणीभूत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. श्वेता बच्चन ही जलसा बंगल्यात राहण्यास आल्याचे ऐश्वर्याला अजिबात पटले नसल्याचे सांगितले जातंय.

हेच नाही तर काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्षा बंगला हा श्वेता बच्चन हिच्या नावावर केला. श्वेता बच्चन ही आपल्या दोन्ही मुलांसोबत सध्या जलसा बंगल्यामध्येच राहत आहे. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडले असून ती तिच्या आईच्या घरी मुलगी आराध्या हिला घेऊन शिफ्ट झाल्याचीही चर्चा आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.