Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kajol | थेट इतक्या कोटींची ऑफिससाठी घेतली काजोल हिने जागा, किंमत ऐकून बसेल मोठा धक्का, तब्बल इतके कोटी

बाॅलिवूड अभिनेत्री काजोल ही तिच्या विधानांमुळे कायमच चर्चेत असते. काजोल हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे काजोल हिची मोठी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. काजोल हिची काही दिवसांपूर्वीच एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Kajol | थेट इतक्या कोटींची ऑफिससाठी घेतली काजोल हिने जागा,  किंमत ऐकून बसेल मोठा धक्का, तब्बल इतके कोटी
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 9:07 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) ही कायमच चर्चेत असते. काजोल हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. काही दिवसांपूर्वीच काजोल हिची वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. विशेष म्हणजे काजोल हिच्या या वेब सीरिजने मोठा धमाका केला. या वेब सीरिजचे जोरदार प्रमोशन करताना काजोल ही दिसली. काजोल तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. काजोल हिची मुलगी नीसा देवगण (Nysa Devgan) ही नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. काही दिवसांपूर्वीच नीसा हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला.

काजोल ही काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना दिसली. विशेष म्हणजे यावेळी चक्क अजय देवगण याला सोडून मनिष मल्होत्रासोबत डिनर डेटवर काजोल ही गेली. या डिनर डेटचे काही फोटो हे काजोल हिने सोशल मीडियावर शेअर देखील केले. काजोल आणि मनिष मल्होत्रा हे दोघे खूप चांगले मित्र आहेत. बऱ्याच वर्षांपासूनची यांची मैत्री आहे.

आता नुकताच काजोल हिच्याबद्दल अत्यंत मोठी बातमी पुढे येत आहे. रिपोर्टनुसार, काजोल हिने मुंबईमध्ये कोट्यावधी किंमतीची मालमत्ता खरेदी केली आहे. काजोल हिने अंधेरीच्या ओशिवरामध्ये येथे ऑफिससाठी जागा खरेदी केली आहे. विशेष म्हणजे यासाठी काजोल हिने तब्बल 7.64 कोटी रूपये मोजले आहेत.

मुंबई येथील अंधेरी वेस्टच्या ओशिवराच्या वीरा देसाई रोडवरील बिल्डिंगमध्ये कालोज हिने आॅफिससाठी जागा खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. 28 जुलै रोजीच काजोल हिने याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेतली आहे. काजोल हिने काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये एक अपार्टमेंटही खरेदी केले. त्यानंतर आता काजोल हिने ही मोठी मालमत्ता खरेदी केली आहे.

काही दिवसांपूर्वीच काजोल ही पापाराझी यांच्यावर भडकताना दिसली. काजोल म्हणाली की, मी घरातून बाहेर पडले होते मी कोणत्याच कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी किंवा पार्टीमध्ये निघाले नव्हते. मात्र, असे असताना देखील दोन लोक (पापाराझी) माझ्या गाडीचा पाठलाग करत होते. मी बांद्राला माझ्या कामानिमित्त जात होते.

माझ्या ठिकाणी जर इतर कोणी व्यक्ती असतील तर तिने या लोकांच्या विरोधात पोलिसांमध्ये धाव घेतली असती. मात्र, मी असे करू शकत नाही. कारण मी कलाकार आहे. काही गोष्टी अती होत असताना देखील आम्ही कलाकार काहीच बोलू शकत नाहीत. एका लेडीजचे दहा ते पंधरा लोक फोटो काढतात, हे देखील बघत नाही की, त्यांची इच्छा आहे किंवा नाही.

'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी.
संतापजनक! 68 वर्षीय वृद्धाकडून 3 शाळकरी मुलींचा विनयभंग
संतापजनक! 68 वर्षीय वृद्धाकडून 3 शाळकरी मुलींचा विनयभंग.
तुळजापूर ड्रग्स प्रकरण; पोलीस अधिक्षक संजय जाधव यांची प्रतिक्रिया
तुळजापूर ड्रग्स प्रकरण; पोलीस अधिक्षक संजय जाधव यांची प्रतिक्रिया.
पुणे गर्भवती प्रकरण, भिसे कुटुंबाला मानसिक त्रास, चाकणकरांकडून निर्देश
पुणे गर्भवती प्रकरण, भिसे कुटुंबाला मानसिक त्रास, चाकणकरांकडून निर्देश.
'आमच्या राजाला न्याय पाहिजे', मस्साजोगच्या ग्रामस्थांनी लावले बॅनर
'आमच्या राजाला न्याय पाहिजे', मस्साजोगच्या ग्रामस्थांनी लावले बॅनर.
'चमकू शुक्ला तू वाट चुकला, आता तुझी..', शुक्लांना थेट मनसेचा इशारा
'चमकू शुक्ला तू वाट चुकला, आता तुझी..', शुक्लांना थेट मनसेचा इशारा.
मुंब्रा अत्याचार आणि हत्या प्रकरण; पीडितेच्या भावाचे गंभीर आरोप
मुंब्रा अत्याचार आणि हत्या प्रकरण; पीडितेच्या भावाचे गंभीर आरोप.
सरपंच हत्येला 4 महिने उलटले, धनंजय देशमुखांच्या बीड पोलिसांना एकच सवाल
सरपंच हत्येला 4 महिने उलटले, धनंजय देशमुखांच्या बीड पोलिसांना एकच सवाल.
पर्यटनाची राजधानी असुरक्षित, अजिंठा-वेरूळला जाताय? जरा जपूनच, कराण...
पर्यटनाची राजधानी असुरक्षित, अजिंठा-वेरूळला जाताय? जरा जपूनच, कराण....
सुप्रिया सुळे तीन तासांपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून
सुप्रिया सुळे तीन तासांपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून.