Kajol Racist Remark व्हिडिओत काजोल जे बोलतेय तो भेदभाव?, एक इंग्रजी अक्षर असं बोलली की, काजोल होत आहे ट्रोल

बाॅलिवूड अभिनेत्री काजोल ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे नुकताच काजोल हिचे बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वेब सीरिज ही प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. या वेब सीरिजचे जोरदार प्रमोशन करताना देखील काजोल ही दिसली होती. आता काजोल मोठ्या वादात सापडलीये.

Kajol Racist Remark व्हिडिओत काजोल जे बोलतेय तो भेदभाव?, एक इंग्रजी अक्षर असं बोलली की, काजोल होत आहे ट्रोल
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 7:26 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकताच काजोल हिने ओटीटीमध्ये पर्दापण केले आहे. विशेष म्हणजे 29 वर्षांनंतर तिने असे काम केले आहे जे ती कोणत्याच चित्रपटामध्ये करताना दिसली नाही. काजोल हिने तिच्या वेब सीरिजमध्ये लिपलाॅक केले आहे. विशेष म्हणजे पडद्यावर तिने तब्बल 29 वर्षांनी लिपलाॅक केले. काही दिवसांपूर्वी राजकिय लोकांवर काजोल हिने एक टिप्पनी केली होती, त्यानंतर तिला टिकेचा सामना करावा लागला होता. काजोल हिचे काही फोटो (Photo) हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये चक्क विदेशात अजय देवगण याला सोडून एका दुसऱ्याच खास व्यक्तीसोबत काजोल ही डिनर डेटला गेली होती.

‘द ट्रायल: प्यार, धोखा, कानून’ या वेब सीरिजमुळे काजोल चांगलीच चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये काजोल ही मुख्य भूमिकेत आहे. मात्र, सध्या काजोल ही मोठ्या वादात सापडल्याचे बघायला मिळतंय. काजोल हिचा प्रमोशनलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये एक धक्कादायक शब्द काजोल हिने वापरला आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे काजोल हिच्यावर थेट वर्णद्वेष केल्याचा आरोप हा सातत्याने केला जात आहे. यामुळेच आता काजोल ही सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. प्रमोशनल व्हिडीओमध्ये काजोल हिने एक असा शब्द बोलला आहे की, तो शब्द ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि लोक संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये काजोल ही ‘N’ शब्द बोलताना दिसत आहे. मुळात म्हणजे हा शब्द काळ्या रंगाच्या लोकांसाठी विशेषतः आफ्रिकन आणि अमेरिकन लोकांविरुद्ध वापरला जातो. यामुळेच आता काजोल हिला ट्रोल केले जात आहे. काजोल हिची ही वेब सीरिज 14 जुलै रोजी रिलीज झालीय. विशेष म्हणजे या वेब सीरिजचे जोरदार प्रमोशन करताना काजोल ही दिसली.

आता या एका शब्दामुळे काजोल हिच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच अजय देवगण याने कुटुंबियांसोबतचा एक खास फोटो हा सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये काजोल, अजय देवगण, त्यांचा मुलगा आणि मुलगी निसा देवगण हे दिसत होते. फॅमिलीसोबत चांगला वेळ घालवताना अजय देवगण या फोटोमध्ये दिसत होता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.