Kajol | काजोल हिचा संताप, थेट म्हणाली, पोलिसांमध्ये तक्रारच, वाचा काय घडले?
बाॅलिवूड अभिनेत्री काजोल ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काजोल हिची मुलगी निसा देवगण ही कायमच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. काही दिवसांपूर्वीच काजोल ही विदेशामध्ये धमाल करताना दिसली होती. विशेष म्हणजे एका खास व्यक्तीसोबत ती डिनर डेलाही गेली होती.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काजोल हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाला रामराम करत असल्याचे जाहिर केले होते. मात्र, काही दिवसांनी परत ती सोशल मीडियावर सक्रिय झाली. अजय देवगण आणि काजोल यांची लेक निसा ही नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. काही दिवसांपूर्वीच निसा देवगण (Nysa Devgn) ही विदेशात फिरण्यासाठी गेली होती, ज्यानंतर तिच्या कपड्यांवरून सतत तिला खडेबोल सुनावले जात होते. काही दिवसांपूर्वीच विदेशामध्ये धमाल करताना काजोल ही दिसली होती. अजय देवगण (Ajay Devgn) याला सोडून एका खास व्यक्तीसोबत डिनर डेला देखील काजोल ही गेली होती.
नुकताच काजोल हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमुळे सध्या काजोल चर्चेत आहे. पापाराझीवर काजोल भडकताना दिसत आहे. काजोल म्हणाली की, मी एक अभिनेत्री आहे. यामुळे पापाराझी यांच्यासमोर उभे राहून पोझ देणे माझे काम आहे. पण मला वाटतंय की ही आता अती होतंय. हे नक्कीच कुठेतरी थांबायला हवे.
मुळात म्हणजे याची सुरूवात झालीये आणि याचा वेग हा सातत्याने वाढतोय, जे धोकादायक आहे. हे सर्व नक्कीच थोडे कमी व्हायला हवे. आम्ही एक कलाकार आहोत. समतोल राखण्याचा प्रश्न आहे. पुढे काजोल म्हणाली की, मला एक घटना चांगलीच आठवते. एकदा दोन पापाराझी यांनी चक्क माझ्या गाडीचा पाठलाग केला होता.
विशेष म्हणजे ज्यावेळी पापाराझी हे माझ्या गाडीचा पाठलाग करत होते, त्यावेळी मी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात, बाॅलिवूडच्या पार्टीमध्ये जात नव्हते. फक्त पापाराझी यांना माझी गाडी दिसली आणि त्यांनी माझ्या गाडीचा पाठलाग गेला. ब्रांदा क्रॉस येथे त्यांनी फक्त माझी गाडी बघितली होती.
पुढे काजोल ही म्हणाली की, माझ्या ठिकाणी जर यावेळी कोणी सर्वसामान्य व्यक्ती असती तर त्यांनी लगेचच पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असती. मात्र, आम्ही कलाकार असल्याने आम्ही असे करू शकत नाही. आम्ही त्यांना असेही म्हणून शकत नाहीत की, तुम्ही फाॅलो का करत आहेत? कारण आम्ही कलाकार आहोत ना. मी एक कलाकार असल्याने मी भिऊ शकत नाही.
8 ते 10 कॅमेऱ्यामॅन आमच्यासमोर उभे असतात फोटो काढण्यासाठी ते हे देखील बघत नाहीत की, काय कपडे घातले आहेत वगैरे. यामुळे कायमच सुरक्षारक्षक घेऊन बाहेर पडावे लागते. या मुलाखतीमध्ये पापाराझी यांच्यावर भडकताना काजोल ही दिसत आहे. यापूर्वी अनेक कलाकारांनी देखील पापाराझी यांच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.