बहिणीच्या किसिंग सीनमुळे संतापली होती कजोल? मित्रांच्या मुलांना देखील दिलेला ‘असा’ सल्ला
tanishaa mukerji kissing scenes : एका सिनेमात बहिणीने अनेक किसिंग सीन दिल्यामुळे काजोल हिने घेतलेला मोठा निर्णय, कोणता होता 'तो' सिनेमा? अनेक वर्षांनंतर सत्य समोर..., सध्या सर्वत्र तनीषा मुखर्जी हिच्या वक्तव्याची चर्चा...
मुंबई | 5 जानेवारी 2024 : अभिनेत्री काजोल हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही काजोल तिच्या एकापेक्षा एक सिनेमांमुळे चर्चेत असते. काजोल हिचे सिनेमे चाहते आजही तितक्याच आवडीने पाहातात. पण काजोल हिची बहीण तनीषा मुखर्जी हिला हवं तसं यश मिळालं नाही. तनीषा हिने 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘श्श्श…’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला. पहिल्या सिनेमानंतर तनीषा ‘नील एन्ड निक्की’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाला चित्रपट विश्लेषक आणि प्रेक्षकांनी देखील प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, तनीषा हिने मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.
तनीषा हिने तिचा दुसरा ‘नील एन्ड निक्की’ सिनेमाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहे. सिनेमात अनेक किसिंग सीन असल्यामुळे आजपर्यंत काजोल हिने बहिणीचा सिनेमा पाहिलेला नाही. एवंढच नाही तर, काजोल हिने मित्रांच्या लहान मुलांना मोठे झाल्यानंतर सिनेमा पाहाण्याचा सल्ला दिला. असं तनीषा म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि तनीषा आणि तिच्या खासगी, प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहेत…
‘नील एन्ड निक्की’ सिनेमात तनीषा हिच्यासोबत अभिनेता उदय चोप्रा मुख्य भूमिकेत होता. रिपोर्टनुसार, सिनेमाच्या शुटिंग दरम्यान उदय चोप्रा आणि तनीषा मुखर्जी एकमेकांना डेट करत होते. म्हणून सिनेमात किसिंग सीन देतात दोघांना फार अडचणी आल्या नाहीत. पण दोघाचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण तेव्हा बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये तनीषा आणि उदय यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली होती.
तनीषा – उदय यांची पहिली ओळख
तनीषा – उदय यांची पहिली ओळख ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. सिनेमात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल मुख्य भूमिकेत होते. तेव्हा उदय त्याचा भाऊ आणि सिनेमा दिग्दर्शक आदित्य चोप्रा याचा सहाय्यक म्हणून काम करत होता. सिनेमात काजोल असल्यामुळे तनीषा देखील सेटवर यायची. तेव्हा उदय आणि तनीषा यांची पहिली भेट झाली. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.
तनीषा बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तनीषा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.