Kalki Koechlin | ‘मी लग्न केलं नाही कारण…’, लग्नाआधी आई होण्याच्या निर्णयावर काल्कीने सोडलं मौन

'ये जवानी है दिवनी' सिनेमातून प्रसिद्धी झोतात आलेली कल्की कोचलिन हिने लग्नाआधी घेतला आई होण्याचा निर्णय; आयुष्यातील मोठ्या निर्णयावर अभिनेत्रीने सोडलं मौन

Kalki Koechlin | 'मी लग्न केलं नाही कारण...', लग्नाआधी आई होण्याच्या निर्णयावर काल्कीने सोडलं मौन
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 10:03 AM

मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्नाआधी आई होण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री कल्की कोचलिन हिने देखील घटस्फोटानंतर लग्न न करता मुलीला जन्म दिला. काल्की आणि बॉयफ्रेंड गाय हर्शबर्ग यांनी २०२० मध्ये आई – बाबा होण्याचा निर्णय घेतला. अखेर काल्कीने मुलीला जन्म दिला. पण लग्नाआधी आई झाल्यामुळे अभिनेत्रीला अनेकांनी ट्रोल केलं. नुकताच काल्की हिने लग्नाआधी आई होण्याच्या निर्णयावर मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र काल्की आणि तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘मी पहिलं लग्न दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासोबत लग्न केलं. पण आमचं लग्न अधिक काळ टिकलं नाही. माझा घटस्फोट झाला आहे. त्यामुळे मला आता लग्नावर विश्वास राहिलेला नाही. म्हणून लग्न न करता विचार करुन निर्णय घेतला.’ असं अभिनेत्री म्हणाली.

कल्की तिच्या पार्टनरसोबत गोव्यात राहते आणि तिच्या प्रोजेक्ट्सच्या संदर्भात मुंबईला येत राहते. एका मुलाखतीत अभिनेत्रीने गोव्यात राहण्याचं कारण देखील सांगितलं आहे. गोव्यात राहण्याचे खरं कारण म्हणजे, निसर्गाच्या सानिध्यात मुलीला आनंदाने जगता यावं.. म्हणून अभिनेत्रीने गोव्यात राहण्याचा निर्णय घेतला. कल्की आणि गाय हर्शव हर्शबर्ग यांची ओळख इस्रायल याठिकाणी झाली.

अखेर दोघांच्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि त्यानंतक प्रेमात झालं. कल्की कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

कल्की हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच झोया अख्तर आण रीमा कागती यांच्या वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्रीच्या आगामी सीरिजचं नाव ‘मेड इन हेव्हन २’ मध्ये दिसणार असून सीरिज प्राईम व्हिडीओ इंडिया या ओटीटी प्लॅटफॉर्म दिसणार आहे.

‘मेड इन हेव्हन २’मध्ये कल्की हिच्यासोबतच शोभिता धूलिपाला, अर्जुन माथुर, जिम सर्भ, शशांक अरोरा आणि शिवानी रघुवंयशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र कल्की हिच्या ‘मेड इन हेव्हन २’ सीरिजची चर्चा रंगलेली आहे.

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.