Amit Shah | अमित शहा आणि प्रकाश राज यांच्या वादात कंगना राणावत हिची उडी, अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या
कंगना राणावत ही नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. कंगना राणावत ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. कंगना राणावत हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कंगना राणावत हही कायमच बाॅलिवूड कलाकारांवर टिका करताना दिसते.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. कंगना राणावत हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या एक व्हिडीओची खिल्ली उडवली जात होती. यावेळी लोकांना खडेबोल सुनावताना कंगना राणावत ही दिसली. कंगना राणावत ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहमीच कंगना राणावत हिच्या निशाण्यावर बाॅलिवूडचे कलाकार असतात. कंगना सध्या तिच्या चित्रपटांपेक्षाही अधिक तिच्या विधानामुळे चर्चेत असते.
कंगना राणावत हिच्या यावेळी निशाण्यावर साऊथ स्टार प्रकाश राज हे आहेत. प्रकाश राज यांना खडेबोल सुनावताना कंगना राणावत ही दिसलीये. प्रकाश राज यांनी अमित शाह यांना टार्गेट करत एक पोस्ट शेअर केली. मात्र, आता प्रकाश राज यांना ही पोस्ट शेअर करणे महागात पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. कंगना राणावत हिने प्रकाश राज यांचा याच पोस्टवरून चांगलाच समाचार घेतलाय.
On the occasion of ‘Hindi Diwas’, Union Home Minister Amit Shah says “Hindi is the name for unifying the diversity of languages of India, the world’s largest democracy. From the independence movement till today, Hindi has played an important role in uniting the country…” pic.twitter.com/4MoQbtSWsB
— ANI (@ANI) September 14, 2023
अमित शहा यांनी हिंदी दिनानिमित्त म्हटले की, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील भाषांच्या विविधतेला जोडणारे नाव हिंदी आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून ते आजपर्यंत हिंदीने आपल्या देशाला जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, अमित शहा यांचे हेच म्हणणे प्रकाश राज यांना आवडले नाहीये. प्रकाश यांनी याचाच समाचार घेतला.
You speak HINDI because you KNOW Hindi…YOU ask US to speak hindi because YOU…KNOW …ONLY …HINDI . #StopHindiDiwas #StopHindiImposition #StopHindiHegemony https://t.co/e08yzjb6i6
— Prakash Raj (@prakashraaj) September 14, 2023
प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, तुम्ही हिंदी बोलता कारण तुम्हाला हिंदीच येते. तुम्ही आम्हाला देखील हिंदी बोलायला सांगता कारण तुम्हाला फक्त आणि फक्त हिंदी येते. हिंदी दिवस बंद करा, हिंदी सर्वांवर लादणे बंद करा, हिंदीचे वर्चस्व थांबवा. असेही प्रकाश राज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Amit Shah ji is from Gujarat , his mother tongue is Gujarati. https://t.co/JYj2lsRIgH
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 15, 2023
प्रकाश राज यांची ही पोस्ट रिशेअर करत कंगना राणावत हिने म्हटले की, अमित शहा हे गुजराती आहेत आणि त्यांची मातृभाषा देखील गुजराती आहे. आता यावरून मोठे राजकारण हे रंगताना दिसत आहे. नेहमीच प्रकाश राज हे भाजपावर टिका करताना दिसतात. हिंदी दिवसाला देखील प्रकाश राज यांचा विरोध असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.