Salman Khan याला कंगना रनौत असं का म्हणाली, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात…’

कंगना रनौत हिच्याकडून अभिनेता सलमान खान याच्याबद्दल मोठं वक्तव्य; अभिनेत्रीच्या वक्तव्यानंतर सर्वत्र खळबळ... सध्या सर्वत्र कंगना रनौत आणि सलमान खान याची चर्चा...

Salman Khan याला कंगना रनौत असं का म्हणाली, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात...'
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 4:15 PM

मुंबई : वादाचा मुकूट कायम आपल्या डोक्यावर घेवून मिरवणारी अभिनेत्री कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री अनेक मुद्द्यांवर स्वतःची स्पष्ट भूमिका मांडत असते. ज्यामुळे तिला वादग्रस्त परिस्थितीचा सामना देखील करावा लागतो. कधी अभिनेत्री सेलिब्रिटींच्या बाजूने बोलते, तर कधी अनेकांना विरोध देखील करते. पण आता अभिनेत्री कंगना हिने अभिनेता सलमान खान याच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. नुकताच, कंगना ३० एप्रिल रोजी हरिद्वार याठिकाणी गेली होती. त्याठिकाणी गंगा आरती झाल्यानंतर अभिनेत्रीने माध्यमांसोबत संवाद साधला… यावेळी कंगना हिला सलमान खान याच्या सुरक्षेबद्दल विचारण्यात आलं. अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सलमना याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

सलमान खान याच्या सुरक्षेबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘ज्यांची सुरक्षा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हातात आहे, त्यांना काळजी करण्याचं काही कारण नाही. त्यांना केंद्र सरकारकडून सुरक्षा मिळाली आहे, त्यामुळे मला खात्री आहे. मला देखील धमकी मिळाली होती, तेव्हा माझ्या सुरक्षेची देखील काळजी घेण्यात आली होती.’

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘मी म्हणाली होती की, देश चांगल्या हातात असतात आपण काळजी का करावी? आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही…’ सध्या सलमान खान याच्याबद्दल अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य सर्वत्र चर्चेत आहे.

हे सुद्धा वाचा

अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर भाईजानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या सुरक्षेसाठी त्याचे बॉडीगार्ड आणि मुंबई पोलीस देखील सतर्क आहेत. अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून अभिनेत्याला व्हाय प्लस सुरक्षा प्रदाण करण्यात आली आहे. याशिवाय खुद्द भाईजानने स्वतःसाठी बुलेटप्रुफ गाडी खरेदी केली आहे.

भाईजान स्वतःच्या सुरक्षेबद्दल म्हणाला, ‘असुरक्षिततेपेक्षा सुरक्षितता चांगली आहे…. सुरक्षा आहे… आता रस्त्यावर सायकल चालवणं आणि एकट्याने कुठेही जाणं शक्य नाही. जेव्हा ट्रॅफिकमध्ये असतो तेव्हा मला अधिक त्रास होतो. माझ्या सुरक्षेमुळे इतर लोकांची गैरसोय होते. ते सर्व मलाही लुक देतात. माझे चाहते… पण मोठा धोका आहे म्हणून सुरक्षा आहे…’

‘चारही बाजूला इतके शेरा आणि इतक्या बंदुका पाहून मी घाबरतो.’ महत्त्वाचं म्हणजे सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर अभिनेत्याच्या कुटुंबाला देखील सतर्क राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे. शिवाय सलमान खाल याला देखील अनेक सुचना देण्यात आल्या आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.