कंगना राणावतने सोडली मुंबई, आता हिमाचलमध्ये राहणार तब्बल 30 कोटींच्या घरात, अत्यंत..
कंगना राणावत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. कंगना राणावत हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. आता अभिनयानंतर कंगना राणावत ही राजकारणात उतरली आहे. विशेष म्हणजे लोकसभेची निवडणूक कंगना राणावत जिंकली आहे. आता कंगनाबद्दल मोठे अपडेट येत आहे.
कंगणा राणावत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. विशेष म्हणजे कंगणा राणावत हिने बाॅलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. कंगणा राणावत कायमच काही बाॅलिवूड कलाकारांवर टीका करताना दिसते. आता कंगणा राणावत ही चक्क राजकारणात उतरली असून ती मंडी मतदारसंघातून विजयी देखील झालीये. लोकसभा निवडणूक 2024 कंगनाने जिंकली आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचा पराभव करून कंगना खासदार झालीये. लोक कंगणा राणावत हिला शुभेच्छा देताना दिसत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.
आता कंगना राणावत ही मुंबई सोडून हिमाचलमध्ये राहण्यास जाणार असल्याचे सांगितले जातंय. विशेष म्हणजे कंगना हिमाचलमध्ये आपल्या आलिशान घरात राहणार असल्याचेही काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. खरोखरच कंगना मुंबई सोडून हिमाचलमध्ये राहण्यास जाणार का? असा प्रश्न तिला सातत्याने विचारला जात आहे.
विशेष म्हणजे कंगना राणावत हिच्या हिमाचलमधील घराची किंमत 30 कोटी आहे. कंगनाचे हे घर अत्यंत आलिशान असून खास डिझाईन करण्यात आलंय. कंगना राणावत हिने तिच्या हिमाचलमधील घराचे काही खास फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कंगना हिच्या घरातून सुंदर पहाड दिसतात. सुंदर निसर्ग आहे.
कंगना राणावत हिचे घर हिमाचली पेंटिंग, विणकाम, कार्पेट्स, लाकडाने सजवण्यात आलंय. कंगना राणावतच्या हिमाचलच्या घरातील लिव्हिंग रूममध्ये एक अत्यंत मोठा सोफा सेट आहे. कंगनाच्या या घराचे दरवाजे आणि खिडक्या या लाकडापासून तयार करण्यात आल्या आहेत. भिंतींवर मोठे मोठे चित्र लावले आहेत.
या घरातील अनेक फोटो हे यापूर्वीच कंगना राणावत हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, अजून कंगना राणावत हिच्याकडून ती नेमकी कुठे राहणार याबद्दल काहीच खुलासा करण्यात नाही आला. कंगना राणावत सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कंगना राणावत दिसते. कंगना राणावत ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे.